Home Crime बोगस दारु,देशी दारु आणि पुरवठादार – विक्रीदार,मकोका अंतर्गत कारवाई हवी!…. —...

बोगस दारु,देशी दारु आणि पुरवठादार – विक्रीदार,मकोका अंतर्गत कारवाई हवी!…. — नागरिकांच्या जिवाशी चालतोय खेळ! — भाग – ०२… 

 रोखठोक 

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

         देशी,विदेशी,गावठी व इतर दारुचा पुरवठा अवैध मार्गाने चंद्रपूर जिल्हातंर्गत ग्रामीण भागात केला जात असताना पोलिस विभागाच्या शिस्तीचा पाढा यात समाविष्ट आहे काय? असा प्रश्न आम नागरिकांना चिंताग्रस्त करतो आहे.

      अलिकडेच काही वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्हातंर्गत मुल व चिमूर तालुक्यात बोगस दारु तयार करून सदर दारुची विक्री जोमाने केली जायची.या बोगस दारुचा विपरीत परिणाम अनेक मद्यपिच्या शरिरावर व मनावर पडलेला होता.बोगस दारुचे शेवण केल्यामुळे अनेकांचे आरोग्य बिघडले असल्याची लोकचर्चा होती.

            आता सुध्दा ग्रामीण भागात जो अवैधरित्या दारु पुरवठा केला जातो आहे,तो दारु पुरवठा योग्य आहे की अयोग्य आहे याची खात्री नाही.

           अवैध मार्गाने दारुचा होणारा पुरवठा,”हा नेमका कुठून होतोय,आणि कोण पुरवठा करतो व अवैध मार्गाने पुरवठा होणाऱ्या दारुची जोमाने तथा बिनधास्त विक्री करणारे कोण?याची उत्तरे पोलिस विभागाकडे नसावी असे त्यांच्या शांत राहणाऱ्या वृत्ती वरुन दिसून येत आहे.

         अनेक मद्यपी सोबत चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले की,अवैध मार्गाने पुरवठा होणाऱ्या दारुची चव वेगळी वाटते व सदर दारु पिल्यानंतर काही वेळाने मद्यपीचे डोके दुखते आणि शरीर थंड पडते.

          यावरून हे लक्षात येते की,ग्रामीण भागात अवैध मार्गाने होणारा दारुचा पुरवठा हा अयोग्य असून नागरिकांचे जीवन धोक्यात आणणारा आहे.

           अवैधपणे दारु पुरवठा प्रकार,हा नागरिकांचे जिवन उध्दवस्त करण्यासाठी कारणीभूत ठरु लागला असल्याने,”यात सहभागी असलेल्यांवर,”मकोका अंतर्गत, कारवाई झाली पाहिजे,असे जाणकारांचे मत आहे..

            अवैध मार्गाने दारुचा पुरवठा करणे,अवैध मार्गाने दारु विकणे,हा प्रकारच संघटीत गुन्हेगारीचा असून यावर लगाम पोलिस विभाग कसणार की अकबार विभाग कसणार याबाबत अजूनही कोडे आहे ….