Home Political पिंपरी बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी प्रणित बोडके तर व्हाईस चेअरमनपदी सचिन...

पिंपरी बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी प्रणित बोडके तर व्हाईस चेअरमनपदी सचिन सुतार यांची नियुक्ती…

  बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

        पिंपरी बुद्रुक, तालुका इंदापूर येथील विविध विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची निवड करण्यात आली. 

          पिंपरी बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या सन २०२५-२६ या कार्यकाळासाठी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यामध्ये चेअरमनपदी प्रणित बोडके तर व्हाईस चेअरमनपदी सचिन सुतार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

         इंदापूर येथील एआर ऑफिस सभागृहात आयोजित निवड प्रक्रियेस संस्थेचे सर्व संचालक मंडळ, आजी-माजी चेअरमन,व व्हॉइस चेअरमन, सभासद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.के शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सचिव, सहसचिव यांची पण उपस्थिती होती. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले.    

          नूतन चेअरमन प्रणित बोडके यांनी बोलताना, सांगितले की “सभासद आणि शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून पारदर्शक आणि गतिमान कामकाज करण्याचा आपला प्रयत्न राहील,” असे सांगितले. तर व्हाईस चेअरमन सचिन सुतार यांनी, बोलताना सांगितले की”संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू,” असा विश्वास व्यक्त केला.

          या निवडीबद्दल ग्रामस्थ, सभासद आणि सचिव, सहाय्यक सचिव विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.