शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमुर :- तालूक्यात वाघ व इतर वन्यप्राण्यांनी धूमाळकुळ घातला आहे.तालूक्यात दोन महीण्यात वाघाच्या हमल्यात तीन शेतकऱ्यानी आपला जीव गमावला आहे.
याचबरोबर तीन नागरीक वाघाच्या हमल्यात गंभीर जखमी होऊन घरी बसले आहे.तद्वतच अनेक पाळीव प्राण्यांचा वाघाने शिकार केली.
शंकरपूर,आंबोली,लावारी,गडपिपरी,शिवरा,शिरसपुर या परीसरात वाघामुळे तीन शेतकऱ्यांनी आपले जीव गमावले आहे.
अनेक पाळीव प्राण्याची शिकार वाघाने केली आहे.या परीसरात नरभक्ष वाघ शेतामध्ये व गावा भोवताल भिरत आहे.
असे असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून नागरीकांना व शेतकाऱ्यांना टोपी फिरवणारे आश्वास दिले जात आहे.
आठ दिवसात,पाच दिवसात,तीन दिवसात अश्या प्रकाची खोटे आश्वासन वनविभागा कडून दिले जात आहे.दुसरी कडे शेतकऱ्याचे आठ-आठ दिवसात जीव जात आहे.
आम्ही कॅमेरे लावले व चाळीस ते पन्नास वन कर्मचारी तैनात केले आहे.पण वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाच्या वनकर्मचाऱ्यांना यश येत नसेल तर कॅमेऱ्यांचा व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा काय उपयोग?असा प्रश्न उबाठाचे चिमूर तालुका उपप्रमुख केवलसींग जुनी यांनी केला आहे.
निष्पाप नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जीव जर वाघ नियमीत घेत असतील तर अशा नरभक्ष वाघांना ठार करा किंवा त्यांचा बंदोवस्त करा हे वनविभागाची जबाबदारी आहे असाही सवाल केवलसिंग जुनी यांनी केला आहे.
पण आमच्या शेतकऱ्यांचे व नागरीकांचे जीव जाता कामा नये.चिमूर तालूक्यातील सर्व गावांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे.देशाच्या सीमेवर आंतकवाद्याची जेवढी दहशत नसेल तेवढी चंद्रपूर जिल्हात वाघांची दहसत झाली आहे.
चिमूर तालुक्यातील त्या नरभक्ष वाघाचा बंदोबस्त १५ दिवसात न केल्यास शिवसेना शुध्दा शेतकरी व नागरीकांच्या जीवासाठी रत्यावर उतरेल,असा इशारा केवलसिंग जुनी तालूका संघटक शिवसेना उ.बा.ठा.यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.



