राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
अहेरी तालुक्यातील पारंपारिक पेरमिली ईलाका पट्टी तर्फे आयोजित वार्षिक गढी पूजा व दसरा पंडुम हा पारंपारिक उत्सव यंदाही भक्तिभाव, संस्कृती आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
या भव्य सोहळ्याला युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी उपस्थित राहून गढी देवीचे दर्शन घेतले आणि पूजा विधीत सहभागी झाले.
यावेळी धर्मराव बाबा आत्राम यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला,ज्याचे वितरण त्यांचे सुपुत्र हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या हस्ते देण्यात आले.
या माध्यमातून धर्मराव बाबा आत्राम यांनी गावकऱ्यांप्रती असलेले जिव्हाळे आणि पारंपारिक संस्कृतीबद्दलचा सन्मान अधोरेखित केला.गावकऱ्यांनी त्यांच्या या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी लहान चिमुकल्यांच्या नृत्य सादरीकरणांना प्रोत्साहन देत पारितोषिके वाटप केली.
यानंतर डॉ.मिताली अक्का आत्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की,“गढी पूजा हा आपल्या परंपरेचा आणि एकतेचा सण आहे.धर्मराव बाबा आत्राम यांचे आशीर्वाद आणि सततचे सहकार्य हीच या पट्टीच्या विकासाची खरी ताकद आहे.”
तसेच पेरमिली ईलाका पट्टीच्या गढी दसरा मध्ये आदिवासी समाजाचा पारंपरिक संस्कृती सदर करण्यात आले.
यावेळी पेरमिली ईलाका पट्टीच्या गढी दसऱ्यात – पेरमिली पट्टीच्या गढी शेंडीया – संजय सडमेक, गढी भूमिया – बोडडा गावडे, पाटील – विठ्ठल मेश्राम, तालुका अध्यक्ष नागेश मडावी, माजी प्राचार्य रतन दुर्गे, माजी सरपंच येरमणार बालाजी गावडे, बाबुराव तोर्रेम, सूरज जाधव, तिरुपती मडावी,तसेच पेरमिली पट्टीतील ५० गावातील पाटील, भूमिया, गायता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पट्टीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



