Home Political गडचिरोली परिवर्तन पॅनलची घोषणा… — भाजप–काँग्रेसला देणार थेट आव्हान! —...

गडचिरोली परिवर्तन पॅनलची घोषणा… — भाजप–काँग्रेसला देणार थेट आव्हान! — वनिता बांबोळे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली :-  नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांना आव्हान देण्यासाठी “गडचिरोली परिवर्तन पॅनल” ची अधिकृत घोषणा दि. 05 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली.

      या आघाडीत बहुजन समाज पार्टी,वंचित बहुजन आघाडी,अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी,आजाद समाज पार्टी,बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी यांसह काही पुरोगामी सामाजिक संघटनांचा सहभाग आहे.

      पॅनलकडून 17 नगरसेवक उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला.

यात पक्षनिहाय वाटप पुढीलप्रमाणे….

     बहुजन समाज पार्टी (BSP): 10 जागा,वंचित बहुजन आघाडी 4 जागा,अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी 5 जागा,आजाद समाज पार्टी 2 जागा,बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (BRSP): 2 जागा…

       रामनगर वॉर्ड: 1 स्वतंत्र उमेदवार

अशा प्रकारे एकूण 24 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले असून,3 जागा समविचारी पक्षांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

      बैठकीत सर्व आघाडीतील पक्षांच्या एकमताने नगराध्यक्ष पदासाठी सौ.वनिता बांबोळे यांचे नाव जाहीर करण्यात आले. 

        दोन वेळा नगरसेवकपदासाठी लढलेल्या,कार्यतत्पर आणि लोकाभिमुख वृत्तीच्या बांबोळे या शहरातील परिचित चेहरा आहेत.

        यावेळी सर्व पक्षांचे जिल्हास्तरीय नेते,कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. “गडचिरोली परिवर्तन पॅनल” ने शहरातील विकास, पारदर्शक प्रशासन आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने लढा देण्याचा निर्धार केला आहे.