Home Social रुग्णास उपचारासाठी आर्थिक मदत देऊन जयश्रीताई नागापूरे यांनी जोपासले उत्तम कर्तव्याचे दायित्व….

रुग्णास उपचारासाठी आर्थिक मदत देऊन जयश्रीताई नागापूरे यांनी जोपासले उत्तम कर्तव्याचे दायित्व….

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

      अच्यानक आलेले संकट आणि या संकटाच्या माध्यमातून कुटुंबियांची झालेली दैन्यावस्था मन हेलावून टाकणारी आहे.एक कर्ता पुरुष जेव्हा आरोग्यातंर्गत शारीरिक दृष्ट्या निकामी होतोय,तेव्हा त्या कुटुंबांची परिस्थिती हालाखीचीच! 

          उपचाराविना खाटेवर निपचित असलेले सलमान सुभान खा पठाण याची गंभीर परिस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका जयश्रीताई नागापूरे (कावळे) यांना कळताच त्यांनी सदर व्यक्तीला त्यांच्या घरी जाऊन आर्थिक मदतीचा आधार दिला…

       उपचार करण्यासाठी सुध्दा 

        सिंदेवाही तालुकांतर्गत मौजा नवरगांव येथील सलमान सुभान खा पठाण या 30 वर्षीय युवकास चायनीजचा व्यवसाय करत असताना अचानक विद्युत तारेचा करंट लागलेला होता.

       यामुळे या युवकास विविध आजाराने ग्रासले होते.घरची हलाखीची परिस्थिती व होणारा महागडा उपचार अशा दुहेरी आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सलमान व त्याच्या कुटुंबाला सुचेनासे झाले होते. 

        याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालिका जयश्रीताई नागापुरे (कावळे) यांना माहिती प्राप्त होताच त्यांनी नवरगावातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित रुग्ण सलमान सुभान खा पठाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या उपचाराकरिता आर्थिक मदत देण्यात आली.

        याप्रसंगी प्रामुख्याने नवरगाव सरपंच राहुल बोडणे,ग्रा.पं.सदस्य पंकज उईके,माजी शहराध्यक्ष सुशांत बोडणे,सचिव आनंद मेश्राम,ग्रा. पं.सदस्या श्वेता कामडी,काँग्रेस कार्यकर्ते सोपान कामडी,ठोनू जैस्वाल,प्रमोद कामडी,नितीन गेडाम,सर्फराज पठाण,रवी चौके,संजय कामडी,विजय कामडी,शैलेश कामडी व इतर काँग्रेस कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.