Home Social उद्या श्री क्षेत्र कपिलधार बीड येथे “जय शिवा” चा जयघोष…  —...

उद्या श्री क्षेत्र कपिलधार बीड येथे “जय शिवा” चा जयघोष…  — श्री मन्नथस्वामी यांच्या जयंतीला कपिलधार येथे राज्यभरातून भक्तभाविक दाखल…

निलय झोडे 

  उपसंपादक 

दखल न्यूज भारत 

नागपूर : महाराष्ट्रातील सौंदर्यात नटलेली पवित्र भूमि, श्री संत शिरोमणी मन्नथस्वामी मंदिर देवस्थान श्री क्षेत्र कपिलधार जिल्हा बीड येथे श्री मन्नथस्वामी यांच्या जयंतीनिमित्त उद्या ( बुधवार ०५ नोव्हेंबर ) ला कपिलधार येथे लाखोंच्या संख्येने भक्तभाविकांचा जनसागर दाखल होत आहे. याचबरोबर येथे “शिवा” संघटनेचा राज्यव्यापी मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. बीड जिल्हा प्रशासनाने या स्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून मेळाव्यात अनेक राजकीय नेते हजेरी लावणार आहेत. 

           महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश येथील वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र कपिलधार, ता. जि. बीड येथे उद्या ०५ नोव्हेंबरला श्री मन्नथस्वामी यांच्या समाधीची २४ वी शासकीय महापुजा आणि ‘शिवा’ अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा ३० वा राज्यव्यापी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

          या भव्य सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे, अतुल सावे, माजी मंत्री धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, तसेच शिवा संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे हे उपस्थित राहणार आहेत. सन १९९६ पासून सुरू असलेली “शिवा” मेळाव्याची परंपरा’ आणि २००२ पासून शासनमान्यता प्राप्त ‘शासकीय महापूजा’ यावर्षी अधिक भव्यतेने पार पडणार आहे. सायं. ४ वा. संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा पार पडणार आहे. 

           येथे शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळावा प्रसंगी “शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार” देऊन राष्ट्रीय स्तरावरील वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. राज्यभरातून पायी दिंड्या, वाहन रॅली आणि जय शिवाच्या घोषणांनी क्षेत्र कपिलधार नगरी गजरणार आहे.

          शिवा संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे यांनी आवाहन केले आहे की, “महाराष्ट्रासह देशभरातील शिवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अशी प्रसारणार्थ माहिती “शिवा” संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी साकोलीहून दिली आहे.