Home Political थिलोरी पं.स. सर्कलमधून शिवसेनेचे (उबाठा)अंकुश कावडकर जनतेचे उमेदवार म्हणून पसंती… 

थिलोरी पं.स. सर्कलमधून शिवसेनेचे (उबाठा)अंकुश कावडकर जनतेचे उमेदवार म्हणून पसंती… 

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक 

        दर्यापूर तालुक्यातील थिलोरी पंचायत समिती सर्कलमधून शिवसेना (उबाठा) युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांना सर्कलमधिल मतदारांची पहिली पसंती असून पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी या मतदार संघातील नागरिकांची आहे.

      अंकुश कावडकर यांची तिसरी पिढी आज शिवसेना (उबाठा)पक्षाशी एकनिष्ठ असून दर्यापूर तालुक्यातील जनतेची कुठलीही कामे असो ती कामे अंकुश कावडकर कुठलाही जातीभेद, धर्मभेद न पाळता निःस्वार्थपणे करीत आहेत. वेळप्रसंगी नागरिकांच्या कामासाठी शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्यासोबत वाद घालून ती कामे करीत असतात. दर्यापूर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले व विद्यमान आमदार गजानन लवटे यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले.

      अश्या एकनिष्ठ, प्रामाणिक असलेल्या अंकुश कावडकर यांचा थिलोरी पंचायत समिती सर्कलमध्ये नावलौकिक आहे. त्यांना थिलोरी पंचायत समिती उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी या सर्कलमधिल मतदारांनी केली आहे.