अबोदनागो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत…
अमरावती :- अमरावती शहर गुन्हे शाखेने सात वर्षाच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेपासून बचाव करणारा एन.डी.पी.एस. कायद्यान्वये दोषी ठरलेला फरार आरोपी सैय्यद मेंहदी मिया सैय्यद पीर (वय २३, रा.जमील कॉलनी,अमरावती) यास अखेर गुप्त पथकाच्या मदतीने अटक करण्यात यश मिळविले.
सदर आरोपीविरुद्ध छत्तीसगड राज्यातील जिल्हा महासमुंद येथील कोमाखा पोलिस ठाण्यात कलम २०(ख)(११)(ख) एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.१५ किलो गांजा बाळगल्याप्रकरणी महासमुंद येथील मा.विशेष न्यायालयाने आरोपीला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.
मात्र न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आले होते.
दरम्यान,आरोपी अमरावती शहरात राहात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीसांनी त्याची गुप्त शोध मोहीम सुरू केली.आरोपी अटक टाळण्यासाठी वेळोवेळी राहण्याचे ठिकाण आणि मोबाईल क्रमांक बदलत होता.
तरी देखील गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्याचे अचूक ठिकाण शोधून आज (दि. १ नोव्हेंबर) जमील कॉलनी परिसरातून त्याला ताब्यात घेतले.सदर आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी छत्तीसगढ राज्यातील जिल्हा महासमुंद येथील कारागृहात दाखल करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री.अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त श्री.गणेश शिंदे,श्री.श्याम घुगे,तसेच पोलीस उपायुक्त (मुख्यालय व गुन्हे) श्री.रमेश धुमाळ आणि श्री.शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि मनीष वाकोडे,अनिकेत कासार (सायबर), प्रियंका कोटावार (सायबर),तसेच पोलीस कर्मचारी फिरोज खान,सतिश देशमुख,मंगेश लोखंडे,सैय्यद नाझीम,रंजीत गावंडे,चेतन कराडे,प्रभात पोकळे,निखील माहूरे (सायबर) आणि सुषमा आठवले (सायबर) यांच्या पथकाने केली.



