Home Crime चारचाकीतून गोवंश तस्करी करणाऱ्यांना पकडले..‌ — स्था.गु.शा.पथकाची मोर्शी येथे धडक कारवाई.....

चारचाकीतून गोवंश तस्करी करणाऱ्यांना पकडले..‌ — स्था.गु.शा.पथकाची मोर्शी येथे धडक कारवाई.. — गाडीतून चार गोवंशीय जनावरे क्रूरपणे कोंबून वाहतूक,४.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त….

अबोदनागो एस.चव्हाण…

जिल्हा प्रतिनिधी अमरावती.

अमरावती :– गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या टोळीविरुद्ध अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोर्शी परिसरात मोठी कारवाई केली आहे. 

        स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका टाटा झेस्ट कारमधून चार जनावरे अमानुषपणे कोंबून नेणाऱ्या दोन संशयितांना पकडत ४.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

       पोलीस अधीक्षक श्री.विशाल आनंद (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंश तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. 

         त्या अनुषंगाने १ नोव्हेंबर रोजी स्था.गु.शा.पथकाचे पो.उप.नि.विशाल रोकडे हे पथकासह मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,एका टाटा झेस्ट गाडीतून (मोर्शी ते अमरावती मार्गावर) जनावरांना पाय व तोंड बांधून कत्तलीसाठी क्रूरपणे नेण्यात येत आहे.

       मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तळणी फाटा परिसरात नाकाबंदी केली.या दरम्यान संशयित टाटा झेस्ट गाडी दिसताच पोलिसांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने पोलिसांना पाहताच पळ काढला.पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून संशयितांना पकडले. 

              तपासादरम्यान गाडीची पाहणी केल्यावर त्यात चार गोवंशीय जनावरे आढळली. गाडीत जनावरांना अमानुषपणे बांधून कोंबलेले आढळले.

         पोलिसांनी गाडी (किंमत ₹३,५०,०००), जनावरे (किंमत ₹६४,०००) आणि मोबाईल फोन (₹१५,०००) असा एकूण ₹४,२९,००० चा मुद्देमाल जप्त केला आहे. 

         आरोपीचे नाव शाहरुख खान कमीज खान वय 28 वर्ष रा.लाल खडी बिस्मिल्ला नगर ता.जि.अमरावती असून मोहम्मद अदनान हा दुसरा आरोपी फरार आहे. 

         सदर आरोपी व जनावरे पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे मोर्शी यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.विशाल आनंद,अपर पोलीस अधीक्षक श्री.पंकज कुमावत,आणि पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) श्री.किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.विशाल रोकडे,पोलीस अंमलदार संतोष तेलंग,दीपक पाल,राजेश कासोटे,दीपक पाटील व चालक किशोर सुने यांच्या पथकाने केली.