अबोदनागो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
दखल न्युज भारत..
अमरावती :- वृंदावन कॉलनी,साई नगर परिसरात आज सकाळी ७ ते ८.३० वाजेच्या दरम्यान एका वृद्ध नागरिकाच्या घरातून सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची घटना घडली.पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलीस माहितीनुसार,सुरेश श्रीराम ठाकरे (वय ७३) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना घराचे कुलूप लावून गेले.८.३० वाजता परत आले असता,घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले.घरात पाहणी केली असता सर्वकाही अस्ताव्यस्त आणि कपाट उघडे होते.
घरातून १ जुनी सोन्याची चेन (वजन २० ग्रॅम,किंमत सुमारे ४०,००० रुपये), सोन्याचे २० मणी दागिने (वजन २.५ ग्रॅम, किंमत सुमारे ५,००० रुपये), आणि दुसरे सोन्याचे दागिने (वजन २.५ ग्रॅम,किंमत सुमारे ५,००० रुपये) गायब असल्याचे दिसून आले.या चोरीमुळे एकूण अंदाजे ५०,००० रुपये किंमतीचा माल चोरांनी लंपास केला आहे.



