Home Crime दत्तझरी मंदिरात जबरी चोरी…. — महिलांना रूममध्ये कोंडले,चार अज्ञात आरोपींनी 27...

दत्तझरी मंदिरात जबरी चोरी…. — महिलांना रूममध्ये कोंडले,चार अज्ञात आरोपींनी 27 हजारांचा ऐवज लुटला.. — टीव्ही व सीसीटीव्ही फोडले. — गुन्हा दाखल…

अबोदनागो एस.चव्हाण

जिल्हा प्रतिनिधी अमरावती 

         दखल न्युज भारत

   परतवाडा :- शहरातील दत्तझरी मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी प्रवेश करून मंदिरातील पारायणासाठी आलेल्या इसमास कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेत चोरट्यांनी एकूण २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समजते.

        घटना ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे दीड ते दोनच्या दरम्यान घडली.फिर्यादी डॉ.रमेश संदाशिव पवार (वय ७६, रा. माळीपुरा,पथोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,चार अज्ञात आरोपी मंदिरात शिरले व मंदीरातील पारायणा करीता आलेल्या ईसमाच्या गळ्याला कोयता लावून धमकावले.त्यानंतर मंदिरातील तीन मोबाईल फोन (किंमत सुमारे २२,००० रुपये) आणि डीव्हीआर कि अं 5000 असा एकूण २७,००० रुपयांचा ऐवज जबरीने लुटून नेला.

         चोरट्यांनी इतक्यावरच न थांबता टीव्ही आणि सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान केले.तसेच मंदिरात राहणाऱ्या महिलांना आणि पारायणासाठी आलेल्या इतर व्यक्तींना रूममध्ये कोंडून ठेवले.

              या घटनेनंतर परतवाडा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ३९४,४२७,४५२,५०६,३४७, तसेच भा.स.नि.अधिनियमातील कलम ३०९(६), ३२४(४), ३३३, ३५१(३), १२७(७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी या गंभीर घटनेचा तपास हाती घेतला असून आरोपींचा शोध सुरू आहे.