Home क्रीडा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण…

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण…

भाविकदास करमनकर

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

        धानोरा तालुक्यातील देऊळगाव येथे जय बजरंग कबड्डी क्लब यांच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या विजेता संघाला आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते स्पर्धेच्या बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमास उपस्थित राहून उत्साही युवकांशी संवाद साधला.

         यावेळी त्यांनी उपस्थिताना खेळामुळे युवकांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते. त्यामुळे अशा स्पर्धा ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

          गावागावात खेळांच्या माध्यमातून युवकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. असे याप्रसंगी आपले मत व्यक्त केले तसेच जय बजरंग कबड्डी क्लब व सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून अश्या प्रकारे खेळाचे आयोजन करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

          याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा सचिव सारंग साळवे, माजी जि.प. सदस्य सिन्नुजी दुल्लमवार, माजी पं.स. सदस्य रामरतनजी गोहणे, सरपंच तुळशीदास गेडाम, उपसरपंच अनिल शेंद्रे ता. महामंत्री सुभाष धाईत, व ग्रामस्थ उपस्थित होते.