शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
वन्य प्राणी असलेल्या हिस्त्र वाघांनी,मनुष्य व पाळीव प्राण्यांचे जगणे मुश्कील केले आहे.म्हणूनच मनष्यांचे व पाळीव प्राण्यांचे बळी घेणाऱ्या वाघाचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपा चिमूर मंडळ अध्यक्ष व साताराचे सरपंच गजानन गुळधे यांनी केली आहे.
हिस्त्र वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग गंभीर दिसत नसल्यामुळे चिमूर तालुक्यातील नागरिक,शेतकरी वनविभागाच्या कार्यशैलीवर कमालीचे नाराज आहेत.
त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संतप्त प्रश्न केला आहे की,मनुष्यमात्रांचे व पाळीव प्राण्यांचे जिव घेण्यात तुम्हाला स्वारस्य आहे काय?
असे असेल तर सरपंच गजानन गुळधे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला की,तुम्ही मनुष्यमात्रांच्या व पाळीव प्राण्यांच्या जिवितहानीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असाल तर तुमचाच बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना,नागरिकांना हातात रुमणे घेऊन तुमच्या कार्यालयाकडे तुमचा बंदोबस्त करण्यासाठी यावे लागले.
हिस्त्र वाघांनी चिमूर तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांवर व पाळीव प्राण्यांवर,गुराख्यांवर हल्ला करुन मारले असताना,वन विभागाच्या अधिकाऱ्यांना झोप येतेच कशी?हा प्रश्न शेतकऱ्यांसह सरपंच गजानन गुळधे यांचा आहे.
त्यांनी वनविभागाला सचेत केले कि,१५ दिवसाच्या आत हिंस्त्र वाघांचा आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान करणाऱ्या इतर प्राण्यांचा बंदोबस्त करावे..



