ऋषी सहारे
संपादक
ब्रम्हपुरी :- चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे ब्रहापुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे उभे पीके नष्ट झालीत पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे शेजाऱ्यांच्या धान कापूस सोयाबीन मिरची मक्का आदी पिकांचे नुकसान झाले.
त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातात येणारे पिक अवकाळी पावसामुळे पिके नष्ट झालीत.मोठ्या आशेने कर्ज घेऊन पिके घेणारा शेतकरी शेवटच्या टप्प्यात आलेल्या पिकांवर अवकाळी पावसाचे सावट आल्याने कर्ज कसे फेडावे यासाठी चिंतातुर झाला आहे.
शेतकरी नेते कॉ.विनोद झोडगे यांनी भरपावसात बरडकिन्ही गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. तात्काळ शेतकऱ्यांना घेऊन उपविभागीय कार्यालय गाठून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान झाले त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावे या मागणीचे मुख्यमंत्री व कृषी मंत्री महाराष्ट्र शासन यांना उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना तुळशीदास काटलाम, विजय उरकुडे,महेंद्र राऊत, सुनिता मेश्राम, गजानन बोंगुरवार,एकनाथ भरडकर,हरी ठाकरे,नलिनी भरडकर, रेवता ठाकरे,शीला भरडकर, भाऊराव ठाकरे,रामदास राऊत, दिनकर प्रधान, आदरक पिलारे, निळकंठ बोडकुलवार, श्रीहरी ठाकरे मनसराम दोणाडकर,रमेश भरडकर,योगेश शेंडे, लोमेश्वर मेश्राम, राधेश्याम तोंडरे, खुशाल वनस्कर,सखाराम माकडे यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.


