उपक्षम रामटेके…
मुख्य कार्यकारी संपादक
अवैध वाहतूक व उत्खनन अंतर्गत वाळू व मुरुमांची जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारातून रात्रोच्यावेळी पसार केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अनेकदा उघडकीस आलाय.
मात्र,वाळू व मूरुमाचे जप्त केलेले ट्रॅक्टर हे चिमूर तहसील कार्यालयाच्या रेकार्डला नोंद होतात काय?हा महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे.
आणि वाळू व मूरुमाचे जप्त केलेले ट्रॅक्टर हे तहसील कार्यालयाच्या रेकार्डला नोंद करण्यात येत असतील तर तहसीलदार चिमूर हे चिमूर तहसीलच्या आवारातून पसार करण्यात आलेल्या ट्रॅक्टर ची तक्रार पोलीस स्टेशन चिमूरला करतात काय?दुसरा प्रश्न आहे.
तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा की,वाळू व मूरुमाचे जप्त केलेले ट्रॅक्टर हे चिमूर तहसील कार्यालयाच्या दप्तरला नोंद केली जात नसतील तर का म्हणून केली जात नाही?
चौथा प्रश्न असा की,वाळू व मूरुमाचे जप्त केलेले ट्रॅक्टर हे चिमूर तहसील कार्यालयाच्या आवारातून रात्रोच्यावेळी पसार करण्यात येत असतील तर या घटनेचे सुत्रधार कोण?
प्रश्न पाचवा असा की, वाळू व मूरुमाचे जप्त केलेले ट्रॅक्टर हे चिमूर तहसील कार्यालयाच्या आवारातून रात्रोच्यावेळी पसार केले जात असतील तर तहसीलदार श्रिधर राजमाने हे कर्तव्यदक्षतेनुसार पुढे का म्हणून येत नाही?किंवा सक्रिय का म्हणून होत नाही…
महत्वाचे असे की,चिमूर तालुक्यात वाळू व मूरुमाचे अवैध उत्खनन नेहमीचेच आहे.चिमूर तालुकातंर्गत सदर गौण खनिजांची भरमसाठ लुट होत असताना अप्पर जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार शांत राहतात हेच खरे मूरुम व वाळूच्या अवैध उत्खननाचे गुपीत आहे व या गुपीतातच भ्रष्टाचाराचे सुत्र आहे काय? याबाबत चिमूर तालुक्यातील नागरिकात उलटसुलट चर्चा आहे.



