अबोदनागो एस.चव्हाण
जिल्हा प्रतिनिधी अमरावती..
दखल न्युज भारत…
अमरावती:- बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या हँडबॅगची चेन उघडून अज्ञात चोरट्याने तिच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना तिवसा बस डेपो येथे घडली.
तिवसा बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून अनेक प्रवाशांना चोरीचा फटका बसला आहे.परंतु चोरट्यांना पकडण्यात पोलिस हतबल ठरले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी सारिका सचिन नागपुरे,रा.डोंगरी रेड्डी बिल्डिंग क्रमांक २,गणेश मंदिराजवळ,गोरेगाव (प.), बृहन्मुंबई,या आपल्या नातेवाईकांच्या गावी जाण्यासाठी तिवसा बस डेपो येथे २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता आल्या होत्या.
त्या मोर्शी जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या हँडबॅगची चेन बेमालूमपणे उघडली.हँडबॅगमध्ये ठेवलेल्या क्रीम रंगाच्या पाउचमधील सोन्याचे ५ ग्रॅम वजनाचे कानातले आणि जुन्या वापरातील ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे मिळून अंदाजे ₹१,०५,००० किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत.
फिर्यादीच्या तक्रारीवरून कलम ३०३(२) बीएनएस आणि कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.


