Home क्रीडा ज्ञानेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी भूषण जगतापची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत निवड… 

ज्ञानेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी भूषण जगतापची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत निवड… 

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे) येथे विभागीय शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या.

       या स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि जुनिअर कॉलेज, आळंदी येथील विद्यार्थी भूषण जगताप याने 17 वर्षांखालील वयोगटातील थाळीफेक या प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला. या यशामुळे भूषणची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

        भूषणच्या या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून शिक्षक, पालक व मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. भूषणच्या यशामागे क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश पवार, मार्गदर्शक शिक्षक साहेबराव वाघुले, श्रीरंग पवार, राजश्री भुजबळ आणि कांबळे वाय.एस. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

       या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ.दीपक पाटील, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, पर्यवेक्षिका अनिता पडळकर आणि अनुजायिनी राजहंस यांनी भूषणचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेत यशासाठी शुभेच्छा दिल्या.