Home Social धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष सोहळ्यात उसळणार ‘भीमसागर’…. — ऍड.संदीप ताजनेनीं घेतला...

धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष सोहळ्यात उसळणार ‘भीमसागर’…. — ऍड.संदीप ताजनेनीं घेतला तयारीचा आढावा…. — प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे-विशाल चव्हाण ठरणार मुख्य आकर्षणाचे केंद्र…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

वाशीम, २८ /१०/२०२५

          समाजप्रबोधन, सामाजिक एकता आणि बौद्ध मूल्यांचा प्रसार हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे येत्या ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पासून भव्य धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याचे आयोजन युवा नेते ऍड.संदीप ताजने यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध शहरातून हजारोंच्या संख्येत अनुयायी उपस्थित राहतील.

          विशेष म्हणजे सुप्रसिद्ध गायक आणि ‘व्हीआयपी राहणं’ फेम साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांचा समाज प्रबोधन आणि भीम गीतांचा कार्यक्रम विशेष आकर्षनाचे केंद्र ठरणार आहे.

           संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘चलो बुद्ध की ओर’ अभियानाअंतर्गत परित्राण बुद्धिस्ट फाउंडेशनच्या वतीने मालेगाव येथील एमसीसी क्रिकेट मैदानावर आयोजित या सोहळ्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनासह जिल्ह्यातील आदर्श बुद्ध विहारांना अष्ट धातुंच्या बुद्ध मुर्ती दान करण्यात येणार आहे. बुद्धविहार समाजातील शिक्षण, संस्कार आणि प्रबोधनाचे केंद्र बनावेत आणि करुणा, मैत्री व समतेचे तत्त्व प्रत्येक घराघरात पोहोचावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे ऍड.ताजणे यांनी स्पष्ट केले.

          सोहळ्यात श्रीलंकेतील डॉ.भदंत अग्गराहेरा कश्शप थेरो तसेच उपासिका आयुष्यमती कौसल्या विक्रमसिंघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यासोबतच माजी न्यायमूर्ती सी.एल.थूल, सिने अभिनेते गगन मलीक, भदंत पय्याबोद्धी थेरो,आंबेडकरी रॅपर विपीन तातड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

           सोहळ्याचा मुख्य उद्देश समाजप्रबोधन, सामाजिक एकता आणि बौद्ध मूल्यांचा प्रसार हा असून, विषमता, अंधश्रद्धा आणि द्वेषभावना दूर करून करुणा, प्रज्ञा आणि समत्वाचा प्रसार करणे हे ध्येय आहे,असे ऍड. संदीप ताजणे यांनी सांगितले. धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात धम्म चळवळ व आंबेडकरी आंदोलनातील ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांना विशेष सन्मानित करण्यात येणार असून, राज्यातील आंबेडकरी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.

         समाजात विषमता,अंधश्रद्धा आणि द्वेषभावना वाढताना दिसतात. अशा वेळी भगवान बुद्धांच्या करुणा, प्रज्ञा आणि समत्वाच्या तत्त्वांचा प्रसार होणे ही काळाची गरज आहे. धम्म हे केवळ धार्मिक साधन नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे,असे ऍड. ताजने म्हणाले