शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
माजी सरपंच निलकंठ भुरे हे शेतावर शेतमालाची पहाणी करण्यासाठी गेले असता,वाघाने त्यांना हल्ला करून शेतातच मारले व ओढ्याजवळ आणि ओढत नेऊन त्यांच्या दोन्ही पायाचे मास खाल्ले.
हि घडलेली घटना अत्यंत मन हेलावून टाकणारी व वनविभागाच्या नाकार्तेपणावर संतापा अंतर्गत रोष व्यक्त करणारी होती.
आज मौजा शिवरा वाशियांकडून चिमूर ते मौजा कान्पा महामार्गावर,(मौजा कवडशी (डागबंगला) ते मौजा किटाळी गावांच्या मधात) वनविभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले व वन विभागाच्या अदक्ष कर्तव्यावर रोष काढण्यात आला व संताप व्यक्त करण्यात आला.
24 तासाच्या आत त्या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली.आंदोलनस्थळी उपस्थित झालेले वनविभागाचे प्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले व वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे संवेदना व समस्या कळविण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ.सतीश वारजूकर,चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,माझी पंचायत समिती उपसभापती स्वप्निल मालके,ग्रामपंचायत सरपंच अतुल नन्नावरे,आंबोली ग्रामपंचायत सदस्य शुभम मंडपे, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



