दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील महाद्वार चौकात आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस बँड पथकाच्या वतीने देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात पोलीस बँड पथकाने “वंदे मातरम्”, “सारे जहाँ से अच्छा”, “ऐ मेरे वतन के लोगों”, “जन गण मन” ‘महाराष्ट्र गीत” यांसारखी देशभक्तीची गीते सादर करून उपस्थित नागरिकांच्या मनात देशप्रेमाचा भाव जागवला. बँडच्या तालावर वातावरण दुमदुमून गेले आणि उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीनेकरण्यात आले होते. यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी सभापती डि.डि.भोसले, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, भाजपाचे पुणे जिल्हा सचिव किरण येळवंडे, भाजपाचे आळंदी शहर सरचिटणीस संजय घुंडरे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, श्री.दत्तनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश कुऱ्हाडे तसेच पोलिस कर्मचारी, वारकरी भक्त आणि आळंदीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



