बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
आई-वडिलांचा व गरूचा आशीर्वाद नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी आसतो, परंतु जिद्दीने चांगला अभ्यास करून आपल्या भागाचे गावाचे व शाळेचे नाव लौकिक करावे.
खटाव तालुका पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सवा निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्या निमित्त पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, गटशिक्षण अधिकारी सोनाली विभुते, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव, शिक्षक समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव, माजी संचालक चंद्रकांत मोरे, संजय दिडके, शहाजी खाडे, राजेंद्र भोसले, जयकर खाडे, जालिंदर विभुते, अनिल लावंड, किसन मगर, विजय खाडे, सचिन माने सह सर्वजण उपस्थित होते.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचा सत्कार एच.व्ही. जगदाळे, समवेत गटविकास अधिकारी योगेश कदम, सोनाली विभुते व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे पुढे सांगत असताना म्हणाले की, आपल्या पाल्याला योग्य वेळी चांगले संस्कार देणे, शैक्षणिक क्षेत्रातून चांगले घडवणे हि काळाची आज गरज आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून माणूस मोठा झाला की त्याच्याबरोबर गाव व शाळेचे नाव मोठे होते. ज्या गावाची शाळा चांगली त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा पट कमी असतो. पेडगाव येथील शाळा चांगली विद्यार्थी संख्या ही चांगलीच आसल्याने गावातील वातावरणही नेहमीच प्रसन्न राहिल्याचे जाणवते. शाळेच्या शताब्दी महोत्सवा निमित्त पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचे यावेळी उदगार…
कार्यक्रमाप्रसंगी गटशिक्षण अधिकारी सोनाली विभुते, माजी सरपंच अंकुशराव दबडे, धनंजय क्षीरसागर, यांनी मनोगत व्यक्त केले. तर सरपंच विनोद मोहिते, शाळा समिती अध्यक्ष आनंदराव जगदाळे, पोलीस पाटील विजय जगदाळे पाटील, शालिवाहन निकम, उपशिक्षक रविंद्र पवार आधी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, आजी-माजी सरपंच उपसरपंच, पोलीस पाटील, सर्वच समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.



