समाजवादी संविधान आणि समाजविरोधी सत्ता अशी ही भारताची अवस्था आहे.
खरे तर, भारतीय स्वातंत्र्याचा लढा म्हणजे छोट्या भांडवलदारांनी मोठ्या भांडवलदारांच्या विरुद्ध केलेली लढाई म्हणजेच देशी भांडवलदारांनी परदेशी भांडवलदारांच्या विरुद्ध केलेली लढाई होय, भांडवलदारा सोबतच मनुवाद्यानी सामाजिक समतेच्या विरुद्ध केलेली लढाई होय.कारण भारतीय स्वातंत्र्याची लढाई प्रथमतः भारतातील भांडवलदार आणि मनुवादी यांनी मिळून केलेली इंग्रजाविरुद्धची ही लढाई आहे, या लढाईत परदेशी विरुद्ध देशी किंवा देशीविरुद्ध परदेशी असा आयाम देण्यात आला, सामान्य भारतीय जनतेमध्ये आधी देशाविषयीचे प्रेम असता निष्ठा भक्ती जागृत करण्यात आली आणि मग परदेशी यांच्या विरोधात त्यांना उभे करण्यात आले, यात भांडवलदार आणि मनुवादी यशस्वी झाले.
भारतीय स्वातंत्र्याच्या उत्तरार्धात स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व हे समाजवादी विचारांच्या काही मोजक्या लोकांच्या हातात गेल्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा समाजासाठी समाजाने लढलेला हा लढा म्हणजे समाजवादी ही लढाई आहे असा आयाम भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मिळाला, हेही तितकेच खरे आहे. जनता रस्त्यावर आल्याशिवाय कोणतीही लढाई यशस्वी होत नाही, हे भांडवलदार आणि मनुवाद्यांना पक्के माहीत होते, त्यामुळे जनतेला रस्त्यावर उतरवायाचे तर हे स्वातंत्र्य तुमच्यासाठीच तुमचेच आणि तुमचे भले करण्यासाठीच म्हणजेच तुम्हाला तुमचे वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येण्यासाठीच हा स्वातंत्र्याचा लढा आहे हे सांगणे जरुरीचे होते त्याशिवाय जनता रस्त्यावर उतरणार नव्हती हेही त्यांना माहीत होते म्हणून जनतेला तशी सांगण्यात आले, तरी परंतु आर्थिक आणि सामाजिक शोषण करणाऱ्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास बसत नाही, म्हणून जमीनदार भांडवलदार किंवा मनुवादी यांचे नेतृत्व जनता स्वीकारणार नाही हे माहीत असल्यामुळे जनतेचे जिव्हाळ्याचे जेवण मरणाचे प्रश्न घेऊन जे रस्त्यावर लढत आहेत असे नेतृत्व त्यांनी हेरले आणि अशा लोकांकडे या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व सुपूर्द केले, लोकांनी त्यांचेवर विश्वास ठेवला, कारण ते जनतेचे म्हणजे शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे आणि कामगारांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई करत होते अशाच व्यक्तींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आणि आधीच राष्ट्रभक्ती देशभक्ती देश निष्ठा राष्ट्रवादी बनलेली जनता म्हणजेच परकीय विरुद्ध चिडलेली जनता या भारतीय स्वातंत्र्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाली आणि भारतीय स्वातंत्र्याची ही लढाई यशस्वी झाली. ही पार्श्वभूमी लक्षात घेणे जरुरीचे आहे.
भारत स्वतंत्र झाला, आणि नेमकी इथेच त्या देशातील भांडवलदार जमीनदार म्हणूनवादी विषमतावादी यांची गोची झाली, कारण भारतीय स्वातंत्र्यात चे नेतृत्व हे समाजवादी विचारांच्या लोकांकडे होते, समाजवादी विचारांचे लोक म्हणजेच नेतृत्व यांनी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आणि स्वतः च्या विचाराची राज्यघटना बनविण्यासाठी प्रयत्न केले, बाबासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्यक्ष भाग जरी घेतला नसला तरी, ते समाजवादी विचाराचे होते, आणि भारतात जेवढे काही विद्वान होते त्यातील ते एक शिरोमणी होते हे त्यांना माहीत होते म्हणून गांधीजी आणि नेहरूजी आणि सरदार पटेल जी यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर ही जबाबदारी सोपवली. बाबासाहेब पण राष्ट्रभक्त देशभक्त राष्ट्रनिष्ठा असलेली एक उदात्त आणि उदारमतवादी व्यक्ती होती, तसेच प्रत्यक्ष गरिबी ची जाणीव असलेली गरिबीचे दुःख भोगलेली व्यक्ती होती त्यामुळे गांधीजींना जे वाटत होते की या देशाचा राष्ट्रपती हा भंगी झाला पाहिजे आणि विकासाची सुरुवात ही शेवटच्या माणसापासून झाली पाहिजे, असे व्हायचे असेल तर तशीच राज्यघटना तयार करावे लागेल आणि ते काम फक्त बाबासाहेबाच करू शकतात, याची खात्री या नेतृत्वाला होती म्हणून भारताचे संविधान हे समाजवादी संविधान म्हणून साकार झाले.
संविधान हे समाजासाठी समाजाकरिता आणि अखिल भारतीय समाज त्यांची संस्कृती त्यांच्या समस्या समोर ठेवून जरी लिहिल्या गेले असले आणि जरी मताचा अधिकार 85% जे वंचित होते आणि आहेत अशा लोकांना देण्यात आला आणि सांगितले की आता तुम्हीच तुमचे लोक सत्तेत पाठवा, तरी या 85 टक्के लोकांना ते जमले नाही, कारण त्यांचे अज्ञान अशिक्षित पणा, गरिबी लाचारी स्वार्थ इत्यादी. आणि महत्त्वाचे हे की, ही बहुसंख्य जनता ग्रामीण जनता असून ती गावातील पाटील देशमुख अशा जमीनदारांवर अवलंबून आहे, त्यांच्याच हुकूमशाहीच्या तालमीत ती संस्कारीत झालेली आहे, गुलामीची त्यांना सवय झालेली आहे, आणि शहरातील जनता ही भांडवलदारांनी ंची बटीक बनवून राहिलेले आहे कारण ती परावलंबी आहे, आर्थिक दृष्ट्या गरीब आहे बेकारी हे त्यांच्या पाचवीलाच पुंजलेली आहे. हे बहुजन मानसिकदृष्ट्या देव आणि धर्माच्या नादी लागल्यामुळे अंधश्रद्धेत गुरफटली आहे, जनतेला हे मनुवादी देव आणि धर्माच्या नादी लावले आहेत, त्याचा फायदा जमीनदार आणि भांडवलदार घेत आहेत, अशा परिस्थितीत भारताला स्वातंत्र्य मिळालेले आहे, स्वातंत्र्य मिळाले याचा अर्थ आर्थिक समता आली किंवा सामाजिक समता आली असे नाही तर आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता ही प्राचीन काळापासून भारतामध्ये होती आणि अजूनही आहे, आणि विषमतावादी लोकप्रतिनिधी पूर्वीपासूनच सत्तेत आहेत आणि लोकशाहीच्या मार्गाने पण अजूनही तेच सत्तेत आहेत, याचे कारण विषमता आणि समता म्हणजे काय? हेच लोकांना माहित नाही. विषमते विरुद्ध समतेची लढाई कशी लढली पाहिजे? आणि समता कशी प्रस्थापित केली पाहिजे ,? त्याचे ज्ञान सामान्य बहुजन जनतेला तर नाहीच परंतु डॉक्टर इंजिनिअर यांनी पीएचडी केलेल्या लोकांना सुद्धा नाही, आजही ही खंत आहे.
भारतीय स्वातंत्र्याचे जर आपण चिंतन केलो तर असे दिसते की, माणसाचे आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक ही जीवनाची जी मुख्य अंग आहेत यापैकी कोणत्या क्षेत्रामध्ये समता आलेली आहे ? भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे झाले, तरी शहाण्या माणसाला हा प्रश्न पडतो आहे. संविधानाच्या उद्देशिका मध्ये उल्लेख केल्यानुसार अजूनही आर्थिक सामाजिक राजकीय न्याय येथील बहुजनांना मिळालेला नाही. याचे कारण संविधान जरी समाजवादी असले तरी सत्ता मात्र समाजविरोधी लोकांच्या प्रतिनिधींच्या ताब्यात आहे, सत्तेत असेच लोक निवडून जातात की जे भांडवलवादी आणि मनुवादी विचाराचे आहेत, म्हणूनच 77 वर्षे होऊ नये जनतेच्या हातात मतदानाचा अधिकार असू नये जनतेच्या अज्ञानी आणि अडाणीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की, संविधान समतावादी परंतु सत्ता मात्र समाजविरोधीच आहे, नव्हे राहणारच आहे, याचे कारण जोपर्यंत बहुजन हे जागृत होणार नाहीत यांच्या जाणिवा जिवंत होणार नाहीत, आणि मताचा गैरवापर करणार नाही तेव्हाच कुठे सत्तेत समाजवादी लोक म्हणजेच प्रतिनिधी जातील आणि तेच ही समाजवादी राज्यघटना अमलात आणतील, शिकलेल्या सवरलेल्या लोकांना तर हे नक्कीच माहित आहे की, बाबासाहेब म्हणाले होते, संविधान जरी समाजवादी असले किंवा कितीही जरी चांगले असले आणि सत्ताधारी जर वाईट असले तर हे संविधान कूचकामी ठरणार आहे, आणि जनतेला जो मताचा अधिकार या संविधानाने दिलेला आहे आणि आपला राजा आपणच बनवायचे आहे याची जाणीव लोकांना जर झाली तर लोक म्हणजे बहुजन सत्तेत जातील आणि पण असे बहुजन की जे भांडवलशाही आणि मनुवादाच्या विरोधी असतील असेच लोक ही समाजवादी राज्यघटना अमलात आणू शकतील,
सत्य परिस्थितीत राजकीय छोटे-मोठे कार्यकर्ते जे बहुजन समाजातले आहेत ते बाबासाहेबांचा मंत्र म्हणजे ” तुम्ही राजकरती जमात बना “हा पाठ केलेला आहे, परंतु ते राजकर्ते जमात बनण्याऐवजी केवळ संपत्ती आणि प्रतिष्ठे पायी, भांडवलदार आणि मनुवादी सत्ताधाऱ्यांचे गुलाम म्हणून सत्तेत जात आहेत, हीच खरी अडचण आहे, याचबरोबर बहुजन समाजातील असे प्रतिनिधी त्यांची गुलामी करण्यासाठी जात आहेत हे मतदारांना समजत नाही ही एक दुसरी मोठी अडचण आहे, या दोन अडचणी जोपर्यंत सुटणार नाहीत, तोपर्यंत समाजवादी संविधान समाजाचे होणार नाही, तर ते मूठभर लोकांच्या हातीच राहणार आहे, या संविधानाचा वापर कसा करायचा ? त्याची तोडमोड कशी करायची ? हे सत्ताधाऱ्यांना पक्के माहित आहे, परंतु यांचे हे षडयंत्र बहुजनांच्या लक्षात येत नाही, हीच खरी अडचण आहे. हे षडयंत्र राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना समजलेले आहे, तरीही ते येड पांघरून पेडगावला जात आहेत, यावर पण इलाज होणे जरुरीचे आहे. स्वार्थासाठी कार्यकर्त्यांनी आर्थिक आणि सामाजिक समतेची लढाई लढण्याऐवजी विषमतावादी समाज रचनेस आपणच खतपाणी घालीत आहोत, अशा व्यवस्थेस आपण मदत करीत आहोत, ही मानसिकता कार्यकर्त्यांनी उघडून फेकून दिली पाहिजे, तरच क्रांती करणे शक्य आहे.
भारताला समाजवादी संविधान मिळणे म्हणजे मनू आल्यावर आंबेडकर वादाचा विजय आहे, परंतु समाजविरोधी सत्ता असणे हा संविधानाचा पराजय आहे, आपण खरोखरच बाबासाहेबांच्या विचाराचे असो, शाहू फुले आंबेडकर मार्क्स विचाराचे जर असू, संविधान वादी असु, तर सत्तेत जे भांडवलशाही आणि मनुवादी विचाराचे लोकप्रतिनिधी जे बहुजनाचे आहेत त्यांना रोखले पाहिजे आणि बहुजनातीलच संविधानवादी आंबेडकरवादी समतावादी विज्ञानवादी मानवतावादी विचाराचे लोक सत्तेत पाठविले पाहिजे, तरच संविधान जिवंत राहील, आणि संविधानातील असे नष्ट झाला आणि केवळ संविधानाचे मुखपृष्ठ आणि मला प्रश्नच राहिले तर परत बहुजनांना प्राचीन काळाप्रमाणे गुलामीच्या अवस्थेतच राहावे लागणार आहे. मनुस्मृति चा कायदा येणार आहे, आपले हक्क आणि अधिकार हिरावून घेतल्या जाणार आहेत, म्हणून उघडा डोळे आणि पहा नीट, आणि रस्त्यावर उतरा, रस्त्यावरची लढाई करा, संविधान वाचवा, संविधानाचे संरक्षण करा, कारण आपले जगणे मरणे हे केवळ संविधानाच्याच हाती आहे. शाहू फुले आंबेडकर , महात्मा बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे महात्मा गांधी नेहरू पटेल आंबेडकर यांचे विचार यांचे स्वप्न साकार करणे म्हणजेच आपल्या जीवनाला नवी पालवी फुटणे होय.
आता आपण बहुजनातील सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी गांधीवाद निर्वाद आंबेडकरवाद मार्क्सवाद इत्यादीचा अभ्यास जरी केला तरी त्या वादात न पडता आणि त्या वादासाठी म्हणजे वाढीसाठी हल्ल्या न कापता आपण सगळे सगळे वादी कार्यकर्ते एकत्र येऊन आपण आपल्या वर्तमानाचा आणि आपल्या लेकरांच्या भवितव्याचा विचार करणे हे आपले कर्तव्य ठरते.
चला तर मग इतिहासातील योग्य ते घेऊन वर्तमानात बदल करूया आणि भविष्य घडवूया, यासाठी विविध विचारांचे पक्षाचे समाज संघटनांचे प्रमुख आणि कार्यकर्ते एकत्र येऊन नवा मार्ग शोधूया,”नवे विचार, नवी वाट, नवे वर्तमान आणि नवे भविष्य निर्माण करूया.
लेखक : दत्ता तुमवाड.
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक: 26 ऑक्टोबर 2025. फोन: 9420912209.


