Home Political जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीची धूम गावागावात… — राजकीय चर्चा गरम…

जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीची धूम गावागावात… — राजकीय चर्चा गरम…

अबोदनागो एस.चव्हाण 

जिल्हा प्रतिनिधी अमरावती..

         दखल न्युज भारत…

चिखलदरा :- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जसजशा जवळ येत आहेत,तसतसे ग्रामीण भागातील गावखेड्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.प्रत्येक गावातील प्रत्येक चौकाचौकात सध्या निवडणुकीचीच चर्चा रंगत आहे.

       कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार,कोणता गट पुढे आणि कोण मागे,यावर चहाच्या टपरीपासून दुकानांवर चर्चा सुरु आहे.

        इच्छुक उमेदवारांनी आपले बाशिंग बांधण्यास सुरुवात केली आहे,काहींनी तर घराघरात जाऊन मतदारांना भेटणेही सुरू केले आहे.पक्षपातळीवर उमेदवारांची चाचपणी सुरु असून गुप्त बैठका आणि रणनीती आखण्याची हालचाल जोमात आहे.

        अनेक ठिकाणी जुन्या नेत्यांना पुन्हा संधी मिळेल का?की नव्या चेहऱ्यांवर पक्षांचा भर राहील यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.गावखेड्यातील राजकीय तापमान वाढत असून निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच वातावरण निवडणुकी सारखेच बनले आहे.

           प्रत्येक पक्षाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.काही ठिकाणी गटबाजी स्पष्टपणे दिसून येत असून कार्यकर्त्यांच्या पातळीवरही स्पर्धा चांगलीच चुरशीची आहे.

         जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुका ग्रामीण भागात राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या ठरणार आहेत.त्यामुळे पुढील काही दिवसांत या चर्चेला आणखी रंग चढेल यात शंका नाही.