शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
सातारा फाट्यावर वाघाने दोन गायींवर हल्ला करुन ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच सरपंच तथा चिमूर भाजप मंडळ अध्यक्ष गजानन गुळधे हे घटनास्थळी दाखल झाले.
चिमूर तालुक्यात कुठले वाघ आणून सोडले याचा नागरिकांना व शेतकऱ्यांना थांगपत्ता नाही.मात्र तालुक्यातील नागरिकांवर व पाळीव प्राण्यांवर वाघाचे होणारे जिवघेण्या हल्ले चिंतेची बाब ठरत आहे.
वाघाचे वाढणारे हल्ले लक्षात घेता,अशा वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सक्रिय का म्हणून होत नाही?हा प्रश्न आहे.



