Home Maharashtra “दिवाळीचा उजेड शहरात,पण शेतकऱ्यांच्या घरात अजूनही अंधार!” — कापसाचं बोंड नाही,सोयाबीनचा...

“दिवाळीचा उजेड शहरात,पण शेतकऱ्यांच्या घरात अजूनही अंधार!” — कापसाचं बोंड नाही,सोयाबीनचा दाणा नाही… — आर्थिक घोषणांचा पाऊस झालाय,पण मदतीचा एक रुपयाही मिळाला नाही! — वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे ठरले खरे! — वांझोट्या सरकारला,”जनाची तर नाहीच,पण मनाची तरी आहे काय?

      रोहन आदेवार

जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ…

      दिवाळी आली आहे,पण यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मात्र अजूनही हालाखीच्या परिस्थितीसी झगडत आहेत.घरात ना कापसाचं बोंड,ना सोयाबीनचा दाणा!,

        महाराष्ट्र राज्यातील अनेक मंत्र्यांनी म्हटले होते की दिवाळीच्या पहिले शेतकऱ्यांच्या अकाऊंटला अतिवृष्टीमुळे झालेल्या,”पिक नुकसान भरपाईची आर्थिक मदत देणार,अशी वल्गना करण्यात आली होती.

      मात्र,झाले उलटेच!,फुटकी कवळी सुध्दा शेतकऱ्यांच्या अकाऊंटला,”वांझोट्या महाराष्ट्र सरकारने टाकले नाही.शेतकऱ्यांच्या बाबतचे एवढे निष्ठूर सरकार,”महाराष्ट्र राज्यात कधीच पाहिले नाही!

          आणि आठवण झाली,वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याची,”ते अकोला येथील सभेत म्हणाले होते,”हे देवेंद्र फडणवीसांच सरकार शेतकऱ्यांना दिवाळी पुर्वी कधीच मदत करणार नाही,कारण देवेंद्र फडणवीसांची निती हे शेतकऱ्यांच्या विरोधातली आहे,ते बोलतात एक आणि करतात दुसरे!ते फक्त शेतकऱ्यांची मते घेण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांना मदत करु शकतात!

         शेतकऱ्यांवर वाढणार कर्जाचं ओझ,त्यांच्या मनात तणावाची परिस्थिती निर्माण करणारी आहे.दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करु म्हणणाऱ्या,”महाराष्ट्र सरकारच्या वचनांचे त्यांनीच वाभाडे काढले असल्याने,”एवढे असंवेदनशील सरकार महाराष्ट्र राज्यात नकोय म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे…

      यंदाच्या खरीप हंगामानं शेतकऱ्यांची अक्षरशः परीक्षा घेतली.कधी अतिवृष्टी,कधी अवकाळी पाऊस,तर कधी कोरडा काळ!या सगळ्या स्थितीमुळे शेतकऱ्यांची चार महिन्यांची मेहनत पाण्यात गेली.त्यातच किड रोगांनी पिकावर आघात केला,आणि उत्पादनात प्रचंड घट आली.

       “इतकी मेहनत घेतली,पण शेवटी हातात काहीच नाही आलय.यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय घर चालवायचं कसं?””असं सांगताना मारेगावच्या एका शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी थिरले आणि आवाजात काळेकुट्ट भविष्य जाणवत होते…

       खतं,औषधं,मजुरी आणि डिझेल सगळ्याचं दर वाढले,पण उत्पादन आणि बाजारभाव मात्र घसरले.

         कापूस ५ हजार ५०० ते ६ हजार ५०० रुपये क्विंटल प्रमाणे घसरला,तर सोयाबीन ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रति क्विंटलवरच थांबला.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हिशोबात आता ‘नफा’ हा शब्द शिल्लकच उरला नाही!.

      निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून घोषणा झाल्या,मात्र अजूनही त्या घोषणा महाराष्ट्र सरकारकडून अमलात आणल्या गेल्या नाहीत.पण जमिनीवर परिस्थिती मात्र तशीच आहे.ना विम्याची रक्कम आली,ना मदतीचा पैसा हातात.

“घोषणा होतायत,पण मदत कुठे आहे?” असा सवाल आता प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठांवर आहे.

       अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांनी शासनाविरोधात मोर्चाची चेतावणी दिली आहे.

“फक्त घोषणा नकोत,कृती दाखवा!” अशा शेतकऱ्यांच्या मागणीलाही महाराष्ट्र सरकार मानत नाही.यामुळे महाराष्ट्राच्या वांझोट्या सरकारला शेतकऱ्यांनी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे!

          काही गावांमध्ये तर शेतकऱ्यांनी दिवाळीचा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

       शेतकऱ्यांचा आवाज आता अधिक तीव्र होत असून प्रशासनाने या आक्रोशाकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती पेट घेऊ शकते,”अशी शेतकऱ्यांच्या मनात महाराष्ट्र सरकार बाबत उद्रेकता व्यक्त केली जात आहे.

        शहरं फटाक्यांच्या आवाजात उजळलीत,पण शेतकऱ्यांच्या घरात अजूनही काळजीचे स्फोट होतायत.सरकारच्या घोषणा जर प्रत्यक्ष कृतीत उतरल्या नाहीत,तर पुढच्या दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरात फटाके नव्हे,संतापाचा स्फोट होईल अशी चिन्हे आहेत….