शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
श्री.विजय गावंडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी चिमूर यांच्या सुचनेनुसार दिनांक १६/ १०/ २०२५ रोज गुरुवारला दुपारी १२ वाजता चिमूर तालुका अंतर्गत निकट भविष्यात जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका २०२५ घोषित होण्याची शक्यता लक्षात घेता चिमूर तालुका कार्यक्षेत्रातील संघटनात्मक बांधणी,कार्यकर्त्यांचे समन्वय, निवडणूकीची तयारी व पदविधर मतदान नोंदणी,कार्यालय उघडणे या सर्व बाबीं संबंधाने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक श्री.संजयजी दुबे हे बैठकीला येणार आहेत.
याचबरोबर या बैठकीला माजी मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते श्री.विजयभाऊ वडेट्टीवार,खासदार डॉ.नामदेराव किरसान,जिल्हा निरीक्षक आमदार श्री.अभिजित वंजारी,जिल्हा अध्यक्ष श्री.सुभाषभाऊ धोटे,माजी अध्यक्ष खनिकर्म महामंडळ तथा माजी आमदार श्री.अविनाश वारजुकर,सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी श्री.सतिश वारजुकर,यांच्या उपस्थितीत चिमूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार आहे.
तरी कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी,सर्व माजी तालुकाध्यक्ष,तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी व सदस्य,माजी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी,माजी पंचायत समितीचे पदाधिकारी,जिल्हा परिषद,पंचायत समिती सर्कल प्रमुख,चिमूर शहर काँग्रेस कमिटी,नेरी शहर काँग्रेस कमिटी,शंकरपूर शहर काँग्रेस कमिटी,भिसी शहर काँग्रेस कमिटी,खडसंगी शहर काँग्रेस कमिटी,पळसागाव पंचायत समिती सर्कल,मासळ पंचायत समिती सर्कल,नवतळा पंचायत समिती सर्कल,नेरी पंचायत समिती सर्कल,शंकरपूर पंचायत समिती सर्कल,डोमा पंचायत समिती सर्कल,आंबोली पंचायत समिती सर्कल,सावरगाव पंचायत समिती सर्कल,खडसंगी पंचायत समिती सर्कल,मुरपार पंचायत समिती सर्कल,तालुका महिला काँग्रेस कमिटी,तालुका युवक काँग्रेस कमिटी,तालुका युवती काँग्रेस कमिटी,सर्व फ्रंन्टल सेल कमिटी अध्यक्ष,काँग्रेस पक्षाचे सरपंच व काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी बैठकी करिता उपस्थित रहावे असे आवाहन विजय डाबरे सचिव तालुका काँग्रेस कमिटी चिमूर,बाळू बोभाटे सचिव शहर काँग्रेस कमिटी चिमूर यांनी केले आहे.
सदर बैठक पिंपळनेरी रोडवरील आधार बंगला येथे होणार आहे..



