Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — चिखलदरा हादरले! चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा जंगलात...

ब्रेकिंग न्यूज… — चिखलदरा हादरले! चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा जंगलात आढळला मृतदेह…

अबोदनगो एस.चव्हाण..

जिल्हा प्रतिनिधी अमरावती..

चिखलदरा :- पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा शहरात सोमवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली.

       चार दिवसांपासून बेपत्ता असलेला मरियमपूर येथील रहिवासी श्री.बबलू बुडला सावलकर (वय ३५) याचा मृतदेह चिखलदरा येथील पर्सपेक्टिव्ह पॉइंटजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बेपत्ता झाल्यानंतर गावात चिंतेचे वातावरण….

     १० ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सकाळी श्री.बबलू सावलकर घरातून कामाच्या शोधात बाहेर पडला होता.परंतु संध्याकाळपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला.चार दिवस उलटूनही काहीच ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांच्या चिंतेत भर पडली होती.

वनकर्मचाऱ्यांच्या दक्षतेने उघडकीस आली घटना…‌

       सोमवारी सकाळी गाविलगड रेंजमधील वनकर्मचारी जंगलात नियमित गस्त घालत असताना त्यांना एका झाडाला लटकलेला मृतदेह दिसला. 

       त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि चिखलदरा पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करून शवविच्छेदनासाठी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

आर्थिक संकटामुळे मानसिक ताण….

      मिळालेल्या माहितीनुसार,श्री.बबलू सावलकर चिखलदरा येथील पंचबोल पॉइंटवर मीठयुक्त फटाके विकायचा.काही दिवसांपासून रोजगार बंद असल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता,अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.

पोलिसांचा सर्वदृष्ट्या तपास सुरू….

      चिखलदरा पोलिसांनी या घटनेचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला तरी पोलिस सर्व शक्यता तपासत आहेत. 

      घटनास्थळावरून कोणतेही संशयास्पद पुरावे मिळाले आहेत का,याचीही चौकशी सुरू आहे.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर…

      श्री.बबलू सावळकर यांच्या मागे पत्नी,तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या मृत्यूमुळे मरियमपूर आणि चिखलदरा परिसरात शोककळा पसरली आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

समाजाच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह…..

      या घटनेने पुन्हा एकदा आर्थिक अडचणींमुळे आणि रोजगाराच्या अस्थिरतेमुळे समाजात वाढत चाललेल्या मानसिक तणावाच्या समस्येला अधोरेखित केले आहे. 

     अशा घटनांमुळे प्रशासनाने मानसिक आरोग्याबाबत जनजागृती आणि मदत केंद्रे उभारण्याची गरज अधोरेखित होत.