सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतीचे आरक्षण जाहिर होताच राजकिय हालचालीना वेग आला आहे. जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद अनुसुचीत जाती महिलांसाठी तर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण सुटले आहे.
यामुळे राजकीय वातावरनात चांगलीच चुरस निर्माण झाली असुन इच्छुक तयारीला लागले आहेत. सावली पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण उमेदवारासाठी आरक्षीत झाल्याने, दरम्यान सावली पंचायत समितीचे कोणते गण त्या प्रवर्गासाठी आरक्षित होतात,याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
संदिप गड्डमवार यांनी विधानसभेत धनुष्यबाण घेऊन निवडणूकित हार पत्करावी लागल्याने नंतर कांग्रेस च्या हाताचा पंजा पकडले व त्यापूर्वी हाताला घडी बांधली होती एकंदरीत संदीप गड्डमवार यांचा चाहता वर्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे कांग्रेसचे मनोबल वाढले आहे.
मात्र स्थानिक सावली येथील चंद्रपुर जिल्हा मध्यवती बँकेचे संचालक रोहित बोमावार निवडणूक जिंकल्यानंतर चिमुरचे लोकप्रिय आमदार बंटी भांगडीया यांची त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती होती त्यामुळे बोमावार भाजपात प्रवेश केले. तर तालुक्यातील समीकरणे नव्याने आकार घेणार असे राजकीय विश्लेषकात चर्चिले जात आहे. मागील निवडणुकीत भाजपचे ३ व कांग्रेस १ जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते तर पंचायत समिती सदस्य काँग्रेस- ४ व भाजपा-४ अशी स्थिती होती.
गेली साडेतीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनूका झाल्या नाहीत गटविकास अधिकारीच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत आहे. सध्या निवडणुका जाहिर होताच पुन्हा इच्छुकांनी पायाला भिंगरी बांधून मतदाराच्या दारापर्यंत जाण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्यात पंचयात समितीचे ८ गण तर जिल्हा परिषदेचे ४ गट आहेत. बोथली पंचायत समिती गण अनुसूचित जमातीसाठी तर व्याहाड खुर्द गण अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. इतर गट व गणात कोणते आरक्षण पडते त्याची उत्सुकता तालुक्याला लागून राहिली आहे. दिनांक १३ ला गट व गणाचे आरक्षण जाहीर होणार असून याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.



