Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — नांदगाव खंडेश्वर येथील व्यापाऱ्याची तब्बल २३ कोटी ३६...

ब्रेकिंग न्यूज… — नांदगाव खंडेश्वर येथील व्यापाऱ्याची तब्बल २३ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांची केली फसवणूक…

 अबोदनागो चव्हाण 

जिल्हा प्रतिनिधी अमरावती..

       दखल न्युज भारत…

अमरावती :- पंजाबच्या एका कंपनीने तांदुळाचा पुरवठा करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम घेऊन तांदळाचा पुरवठा न करता नांदगाव खंडेश्वर येथील व्यापाऱ्याची तब्बल ₹ ३ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे धक्कादायक प्रकरण पुढे आले आहे.

        फिर्यादी कृणाल रविंद्र मोरे (वय ३३, रा. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) हे परदेशात धान्य आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्या फर्मशी संबंधित आहेत. 

       त्यांनी आपल्या भागीदार चंदनकुमार गुप्ता यांच्यासह कंपनीच्या माध्यमातून तांदूळ निर्यात व्यवहारासाठी मार्च २०२३ मध्ये परदेशातून ३,००० मेट्रिक टन तांदळाची मोठी ऑर्डर मिळवली होती.

        त्या अनुषंगाने गुगलच्या माध्यमातून त्यांनी पंजाबमधील एफडी एक्स्पोर्ट (होशियारपूर) या कंपनीशी संपर्क साधला.कंपनीचा मालक करन पुरुषोत्तम गुप्ता व त्यांची भागीदार दिया गुप्ता यांच्याशी तांदूळ पुरवठ्याबाबत व्यवहार ठरला होता. 

       मागणीनुसार फिर्यादीने ०३ एप्रिल २०२३ रोजी ₹२३,८६,०००,११ मे २०२३ रोजी ₹ ४५,००,०००,१८ मे २०२३ रोजी ₹ ४५,००,००० आणि २६ मे २०२३ रोजी ₹ २३,००,००० याप्रमाणे एकूण ₹ ३,३६,८६,००० रक्कम आरटीजीएस द्वारे त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली.

       वरील रक्कम घेतल्यानंतरही आरोपींनी तांदूळ न पाठवता जाणूनबुजून वेळकाढूपणा केला. 

         दिड वर्षाच्या पाठपुराव्यानंतरही त्यांनी रक्कम परत न देता जाणिवपूर्वक आर्थिक फसवणूक आणि विश्वासघात केला असे लक्षात आल्यावर शेवटी फिर्यादीने राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

        राजापेठ पोलिसांनी फिर्यादीनुसार भादंवि कलम ३१६,३१८(२),२३(५) बीएनएस अन्वये नोंद केला आहे…