Home Social मानिक नगर,वडाळा पैकु पावशी आंबा,श्रीहरी बालाजी नगरी येथील येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी...

मानिक नगर,वडाळा पैकु पावशी आंबा,श्रीहरी बालाजी नगरी येथील येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांना दिले निवेदन…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी.

        चिमूर नगर परिषद हद्दीतील मानिक नगर,वडाळा पैकु-पावशी आंबा जवळील श्रीहरी बालाजी नगरी या ठिकाणी अद्यापही थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात आलेला नाही.

     सिंगल फेज विद्युत पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना व्होल्टेज कमी जास्त होण्याचा त्रास होत आहे.सदर विद्युत पुरवठ्‌याने घरातील असलेले उपकरणे यामध्ये वारंवार बिघाड येत आहे.

            या संदर्भात विद्युत कार्यालय चिमूर येथे तक्रारी करण्यात आले होते,मात्र विद्युत कार्यालयाने आमच्या तक्राराची दखल घेतलेली नाही.

      त्यामुळे सिंगल फेज विद्युत पुरवठ्‌या ऐवजी थ्री फेज ची लाईन टाकुन थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात यावा.तसेच पक्के रस्ते व पक्क्या नाल्याचे बांधकाम करणेबाबत आपण स्वतः याबाबत चौकशी करून रस्ते व नाल्यांची समस्या सोडवावी अशा मागणीचे निवेदन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भाऊ भांगडिया यांना वॉर्डातील जगदीश बोरकर,सतीश ढाकुणकर,पवन मुळे,जावेद पठाण आदी नागरिकांनी दिले आहे.