Home Social सरपंच भोजराज कामडी यांचे प्रयत्न फळाला येण्याची चिन्हे!,”आमरण उपोषण तात्पुरते स्थगित!… ...

सरपंच भोजराज कामडी यांचे प्रयत्न फळाला येण्याची चिन्हे!,”आमरण उपोषण तात्पुरते स्थगित!… — महादवाडी येथील अतिक्रमण हटाव प्रकरणासंबंधाने १६ आक्टोबर नंतर पोलिस बंदोबस्त मिळणार – पोलीस अधिक्षक सुदर्शन मुम्मका… 

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

       चिमूर तालुकांर्गत मौजा महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी हे गावाचा विकास करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि प्रशासकीय दरबारात धावपळ करतांना दिसून येतात.

       अशीच एक समस्या त्यांना सतावत आहे,ती म्हणजे गावातील आणि ग्रामपंचायत तथा शाळेसमोरील अतिक्रमण काढणारी समस्या होय.

       यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन प्रशासकीय यंत्रणेला सुपुर्द केले आहे.१३ महीन्यापासुन हे प्रकरण रेंगाळत चालले आहे.

         अतिक्रमीत जागेच्या मोजणीचे कागदपत्रे,संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना देवुन सुद्धा प्रशासनाकडुन सहकार्य मिळत नसल्याने तसरपंच हतबल झाले होते.

           ज्या सरकारी जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे,तिथे घाणीच्या साम्राज्याने विळखा घेतला आहे असुन अडथळे व त्याठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे.

        त्यासाठी सरपंच भोजराज कामडी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची नुकतीच चंद्रपूरला भेट घेऊन आपबिती सांगत कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे अस्त्र उगारले होते.

       मात्र,उपोषणाला बसण्या आधीच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी १६ आक्टोबर नंतर तातडीने अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले 

        १३ महीन्यापासुन रेंगाळत चाललेला अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा सुटण्याची चिन्हे दिसत असल्याने सरपंच भोजराज कामडी यांच्या विनंम्रपणे नजरा प्रशासकीय यंत्रणे आहेत.