अबोदनगो.एस.चव्हाण..
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील वरूड व अमरावती शहरात तीन मोटारसायकली चोरीस गेल्याच्या घटना उघडकीस आल्या असून,स्थानिक पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहे.
पहिली घटना वरूड शहरातील मोठ्या भाजी बाजाराजवळ घडली. फिर्यादी निखील सुरेशराव पडोळे (वय ३३, रा. गव्हाणकुंड, ता. वरूड) यांची जुनी होंडा सीबी शाईन (काळा रंग, लाल पट्टे, क्र. एमएच -२७- सी एच ६५५८७ ) ही दुचाकी ५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते १० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. गाडीची किंमत अंदाजे ३० हजार रुपये असून वरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना याच परिसरात काही तासांनंतर घडली.भुषण राजेंद्र कपले (वय २५, रा. घाटलाडकी, ता. चांदुरबाजार) यांच्या मालकीची होंडा शाईन (काळा रंग, लाल पट्टे, क्र. एमएच -२७-सीक्यू -3618) ही दुचाकी सुद्धा ५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ७ ते १० वाजेदरम्यान चोरीस गेली. या दुचाकीची किंमतही सुमारे ३० हजार रुपये आहे. दोन्ही घटना एकाच भागात घडल्याने पोलिस तपासात चोरट्यांचा समान टोळीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, तिसरी चोरीची घटना अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. फिर्यादी गौरव राजेंद्र गोंगे(वय ३०, रा. सोनेरी, ता. चांदुरबाजार) यांनी आपली हिरो स्प्लेंडर प्रो (क्र. एमएच-२७ -ए व्ही-५७३३) ही दुचाकी आयटीआय कॉलेजच्या भिंतीजवळ ६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते ३.३० दरम्यान पार्क केली होती. काही वेळाने ते परत आले असता दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आले. वाहनाची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले आहे.



