प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
गोरगरिबांना योग्य शिक्षण देणारी शासकीय यंत्रणा नाही-शासनाचे योग्य कृतीशील शिक्षण धोरण नाही,भाजपाचे केंद्र सरकार व भाजपाचे राज्य सरकारे नौकऱ्यांची व रोजगाराची हमी देत नाही,गोरगरिबांचे मुले अडाणी राहावे म्हणून देशभरातील ९० हजार शाळा भाजपाच्या सत्ताकाळात बंद करण्यात आल्यात,देशातील शिक्षणप्रणाली एकसारखी नाही,देशात कंत्राटी पद्धती सुरू करून देशातील युवकांचे व बेरोजगारांचे शोषण केले जात आहे.
अशा अनेक विषयाला अनुसरून ६ आक्टोंबर २०२५ रोज सोमवारला भारतीय विद्यार्थी मोर्चा द्वारे महाविशाल रॅली दिल्ली येथे काढण्यात आली होती.मुल निवासी विद्यार्थ्यांच्या अनेक गगनभेदी स्लोगन ने ब्राह्मणवादी सत्तेला हादऱ्यावर हादरे काल बसले असल्याचे दिसून येते आहे.
भारत मुक्ती मोर्चा अंतर्गत येत असलेला,”भारतीय विद्यार्थी मोर्चा,हा भारत देशातील प्रस्थापित सरकारला हादरे देण्यासाठी तयार असून,काल दिल्ली येथील जंतरमंतरवर देशभरातून लाखो विद्यार्थी आले होते.मुल निवासी विद्यार्थ्यांची महा रॅली बघून दिल्लीकर थक्क झाले होते.
दिल्ली सरकार व पोलीस विभाग यांच्या तिव्र विरोधानंतरही दिल्ली येथे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली,”भारतीय विद्यार्थी मोर्चाची राष्ट्रीय स्तरावरील विशाल रॅली व विशाल जनसभा यशस्वी ठरली…
भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या जनआक्रोश महारॅली ला पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जोडाफेक प्रकरण…
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली,”भारतीय विद्यार्थी मोर्चाची जनआक्रोश महारॅली यशस्वी ठरली असल्याने या महारॅली ची चर्चा देशभरात व विदेशात होऊ नये म्हणून कदाचित सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भुषण गवई यांना जोडा मारण्याचे प्रकरण जाणिवपूर्वक केले असावे असे वाटते आहे…
कारण भारत देशाचे मुख्य न्यायाधीश म्हटले की,त्यांच्या भोवती चर्चा अंतर्गत प्रकरण दिवसभर घुमवत ठेवणे हा मुख्य उद्देश मनुवादी पिलावळीचा होता काय? या अनुषंगाने आता प्रामुख्याने चर्चा केली गेली पाहिजे.
मनुवाद्यांचे कटकारस्थान हे वेळेनुसार व त्यांच्या धोरणानुसार ठरलेले असतात आणि त्यांचे कटकारस्थान हे गोपनीयता बाळगणारे असतात हे लक्षात घेतले तर,”मंदिराचा निर्णय मुद्दा,”हा,”भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या राष्ट्रव्यापी जनआंदोलनाच्या दिवसीच वकील राकेश किशोर यांना उकरुन काढण्याचे कसे काय सुचले? हा एक गहन आणि गंभीर मुद्दा आहे…
भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडे,”जोडा भिरकावण्याच्या प्रकरणात,बरेच गोपनीय खलब्बते विविध स्तरावरुन झाले असावेत? हे नाकारता येत नाही…
याचबरोबर देशातील मुल निवासी नागरिकांना गुंगे,बहिरे,आंधळे,करुन ठेवायचे आणि स्वतः सत्तेची व प्रतिष्ठेची मजा लुटायची,ही मनुवाद्यांची जुनीच रित!





