भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
चातगाव उपक्षेत्र यांच्या तर्फे चातगाव जिल्हा परिषद शाळा काटेझरी चातगाव शाळा, सावरगाव शाळा कुरखेडा शाळा, कुडकवाही शाळा व परिसरातील शाळांमध्ये वन्यजीव सप्ताह निमित्त एक आक्टोंबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान शाळांमध्ये सुनील सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले होत्या.
प्रथम या कार्यक्रमाची सुरुवात वनपरिक्षेत्र चातगाव येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यामध्ये चित्रकला स्पर्धा वाद विवाद स्पर्धा व सावरगाव नियतक्षेतर z.p शाळा सावरगाव येथे वन्य जीव सप्ताह निमित्त गावात जनजागृती फेरी काढण्यात आली नागरिकांमध्ये वनक्षेत्राचे रक्षण करणे तसेच वन्य प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण वन्यजीवचा पर्यावर्णशी समतोल राखावा याविषयी माहिती नागरिकांना देण्यात आली.
चित्रकला स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सहभाग घेतला यात सहभागी घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस हे सुद्धा देण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र चातगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनटक्के वनपरिक्षेत्र अधिकारी चातगाव सु. वी. सोनटक्के,पी डी मोहूलै, क्षेत्र सहायक चातगाव,गणेश धंगरे वनरक्षक बामणी, सावरगाव वनरक्षक कु. सहारे मॅडम, मेश्राम वनरक्षक चातगाव, टेंभूर्णीकर वनरक्षक उ.जांभळी व वनपरिक्षेत्र चातगावचे सर्व वनकर्मचारी व गावकरी उपस्थित होते.



