उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
शेतकरी म्हणजे या देशातील नागरिक आणि मतदार!,याचबरोबर देशाच्या जडणघडणीतील महत्त्वपूर्ण घटक!,”असे असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत, सत्ताधाऱ्यांचा वेळकाढूपणा योग्य आहे काय? हा प्रश्न मनाला चटके देणारा आहे..
आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत.त्यापुर्वी मोजक्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्याकडून पिक नुकसान भरपाई दिली जाईल आणि आपल्या सत्तेची वाव्हा करुन घेतली जाईल असे चिन्हे आहेत.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून,अतिवृष्टीमुळेच जमीनीच्या पोतीची पत घसरल्याने उर्वरित पिकांची उत्पादकता कमी होणार येवढे निश्चित झाले आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारने करावी अशीच गंभीर स्थिती महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची आहे.
पंजाब राज्याच्या सरकारने पर हेक्टर शेतकऱ्यांना ८० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ८० हजार रुपये द्यावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
मात्र,महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पिक नुकसानभरपाई अंतर्गत आर्थिक मदत देणे सुरू झाल्यावर महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांच्या प्रतीची वास्तव जबाबदेही समोर येईल…
परंतु महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आणि त्यांचे मंत्रीमंडळ शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घेतात हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.



