दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
भाजपाचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून सोन्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे आणि सातत्याने वाढ होते आहे.काॅंग्रेस सरकारच्या काळात ३० हजार रुपये तोळा सोनं होतं.तेच सोनं आता भाजपाच्या सत्ता काळात केवळ ११ वर्षात १ लाख रुपयांच्या वर पर तोळा झाले आहे.
भाजपाच्या सत्ता काळात प्रत्येक वस्तूचे भाव वाढवून सर्व सामान्य नागरिकांच्या खिशातून लूट केली जात आहे.
सोन्याचे भाव सातत्याने वाढविताना आंतरराष्ट्रीय चलन पुढे केले जाते आहे.यामध्ये जागतिक आर्थिक अस्थिरता,डॉलरची कमकुवतता,आणि कमी व्याजदराचे वातावरण अशी कारणे पुढे केली जात आहेत.
यामुळे भविष्यकाळात पुन्हा सोन्याचे दर वाढू शकतात असे सांगण्यात येत आहे.म्हणूनच भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांनी सोने खरेदी करणे बंद केले पाहिजे.
गुंतवणूकदार सुरक्षित आश्रयस्थान शोधत असल्याने सोन्याची मागणी वाढत आहे,असेही म्हटले जाते.
डॉलरचे मूल्य कमी झाल्यास (उदा. डॉलर निर्देशांक १०० च्या खाली आल्यास), सोने इतर गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक बनते,ज्यामुळे सोन्याच्या किमती वाढतात.
याचबरोबर कमी व्याजदराचे वातावरण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक ठरते, ज्यामुळे त्याची मागणी वाढते आणि किमती वाढतात असे पुढे आले आहे.
जागतिक स्तरावर भू-राजकीय तणाव किंवा अस्थिरता निर्माण झाल्यास सोने यासारख्या सुरक्षित मालमत्तांमध्ये गुंतवणूक वाढते, असे Divya Marathi ने म्हटले आहे.
विशेषतः गोल्डमन सॅक्सने २०२६ च्या मध्यापर्यंत ६% वाढीचा अंदाज वर्तवला आहे.
सोन्याच्या किमतीवर जागतिक ईटीएफचा प्रवाह,मागणीतील वाढ,आणि महागाईचाही परिणाम होत राहील,असे The Economic Times ने म्हटले आहे.
सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता 2025 च्या काही तिमाहीत आणि जानेवारी महिन्यात आहे,कारण मजबूत यूएस डॉलर,व्याजदरात वाढ आणि कमी मागणी यांसारखे घटक कारणीभूत ठरू शकतात.तथापि, भू-राजकीय तणाव,सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी आणि आर्थिक अनिश्चितता यांमुळे सोन्याचे भाव वाढू देखील शकतात,त्यामुळे सोन्याच्या भावासंबंधाने निश्चित भविष्यवाणी करणे कठीण आहे.
आर्थिक मंदीची भीती किंवा अनिश्चिततेमुळे लोक सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानतात,म्हणूनच सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे.
जगाच्या तुलनेत भारत देशात लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याने इथं सोन्याच्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात आहेत.याचबरोबर भारत देशात सनासुदीच्या दिवसांना अनुसरून आणि लग्न समारंभाला अनुसरून सोन्याच्या खरेदीला महत्त्व दिले जाते.
यामुळे भारत देशात भाजपाच्या केंद्रीय सत्ता काळात पर १ तोळा ७५ हजार रुपयांची भरभक्कम आणि आवाक्याच्या बाहेरची झालेली वाढ समजन्या पलिकडची आहे.
तद्वतच ११ वर्षातंर्गत सोन्याच्या दरात झालेली भरमसाठ वाढ अचंबित करणारी व आश्चर्यकारक असल्यामुळे देशातील नागरिकांना लुटन्याचा व त्यांची आर्थिक परिस्थिती खिळखिळी करण्याचा हा धंदा तर नाही ना?अशी शंका येवू लागली आहे…
म्हणूनच भारतातील नागरिकांनी सोने खरेदी करणे बंद केल्यास सोन्याचे भाव पडणार असे दिसून येते आहे.


