युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रीय सेवा योजना व समाजशात्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 156 वी व लालबहादूर शास्त्रीयांची 121वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.भारत कल्याणकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रविंद्र इचे होते.प्रमुख अतिथी डॉ.प्रविण सदार, प्रा सागर भुसारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन,प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी केले,आभार कु.सायमा शेख हिने केले,व्याख्यानाला रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



