युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
जि. प. व पं. स. च्या लांबलेल्या निवडणूका या लवकरच होणार असून त्याची मोर्चेबांधणी इच्छुक उमेदवार करित असून ते मतदारांच्या भेटीही घेत आहेत.
दर्यापूर तालुक्यातील खल्लार जि. प किंवा पं. स सर्कलमधून उपराईचे युवा सरपंच व शिवसेनेचे (शिंदे गट)माजी जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांचे निकटवर्तीय निरज नागे यांना खल्लार जि. प किंवा खल्लार पं. स. गणाची उमेदवारी मिळण्यात यावी अशी मागणी शिवसेना (शिंदे गट)पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कट्टर शिवसैनिक असलेले निरज नागे हे गेल्या दिड वर्षापासून उपराई गावाचे सरपंच म्हणून काम करित आहेत. दिड वर्षाच्या कार्यकालात गावातील बरीच विकासकामे केली आहेत.तसेच उपराई परिसरातील अनेक नागरिकांचे कामे कोणताही गाजावाजा न करता केलेली आहेत.
नागरिकांच्या सुख दुःखात नेहमीच धावून जाणारा अशी ओळख निरज नागे यांची असल्याने त्यांना पक्षाने जि. प. किंवा पं. स. ची उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षातील पदाधिकारी यांनी केली आहे.



