Home Social हिंगणा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा… — विनोद खोब्रागडे यांचा...

हिंगणा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा… — विनोद खोब्रागडे यांचा सहपत्नीक सत्कार!

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादीका 

      दिनांक 3/10/2025 रोजी हिंगणा- नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल हिंगणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आयु विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर व पत्नी आयु अनुताई विनोद खोब्रागडे यांच्या पुष्पगुच्छ देऊन व पंचशील दुप्पटा गळ्यात टाकुन जाहीर सत्कार करण्यात आला.

           धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु विनोद खोब्रागडे यांनी नागरिक व त्यांच्ये अधिकार व कर्तव्ये बाबत आणि कायद्याचे मार्गदर्शन अनेक उदाहरणे देऊन दिले.

          प्रबोधनकार संविधान शेंडे नागपूर व निशाताई धोंगडे मॅडम चंद्रपूर यांनी जबरदस्त प्रबोधन केले,या कार्यक्रमाचे प्रसंगी परिसरातील मोठ्या प्रमाणात अनुयायी उपस्थित होते.