कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारसिवनी
कन्हान : – कन्हान शहरात विविध संघटन द्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिवस विविध कार्यक्रमान्वये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याचबरोबर धम्मचक्र प्रवर्तन व विजयदशमी दिवसाच्या निमित्ताने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
राजे फाउंडेशन कन्हान आणि सद्धम्म बौद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन आणि विजयीदशमी दिवस निमित्त रेल्वे स्टेशन रोड,गांधी चौक येथे भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या उपक्रमात बाहेरून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी भोजनदानाची व्यवस्था करुन वितरण करण्यात आले.
धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमी हा सामाजिक ऐक्य व बंधुभाव वाढवणारा दिवस आहे.भोजनदान उपक्रमाद्वारे या पवित्र दिवशी भाविकांची सेवा करण्याचा आम्हाला आनंद आहे असे आयोजकांनी सांगितले.
या प्रसंगी राजे फाउंडेशनचे अध्यक्ष केतन भिवगडे,कैलासजी भिवगडे,आर्यन मेश्राम,रोशन सोनटक्के,नितीन मेश्राम,रॉबिन निकोसे,चिराल वैद्य,रितेश जनबंधू,प्रणय भिवगडे,शुभम चहांदे,देवांशू मेश्राम,अनिकेत मेश्राम,अर्चना मेश्राम,वंदना भिवगडे,वैशाली गजभिये,वनमाला चहांदे,संजना मेश्राम,भारती भिवगडे,संघमित्रा राऊत,सुजाता वासे,वर्षा मेश्राम,करिश्मा मेश्राम,रीना मेश्राम सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.



