Home Crime त्या अल्पवयीन मुलींने ११ मुलांना केले ब्लॅकमेल.. — लाखो रुपयांची वसुली,चिमूर...

त्या अल्पवयीन मुलींने ११ मुलांना केले ब्लॅकमेल.. — लाखो रुपयांची वसुली,चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.. 

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

     चिमूर शहरातील एका अल्पवयीन मुलीने चक्क एक महिला पोलीस अधिकाऱ्याचे नावाचा धाक दाखवून तब्बल ११ मुलांना ब्लॅकमेल करत १ लाख ३३ हजार रुपये उकळल्याचा आगळावेगळा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी तक्रार दाखल झाली.

       मात्र,सदर अल्पवयीन मुलगी एका महिला पोलीस अधिकाऱ्यांचे नाव घेत रुपये उकळत असेल तरी रुपये देण्याची कारणे काय? आणि त्या मुलीच्या दबावात येणारा घटनाक्रम काय? हा महत्त्वाचा मुद्दा गंभीर दिसतो आहे.

       नेहरू वॉर्डातील तक्रारदार ज्ञानेश्वर सुभाष बालपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा प्रकार उघडकीस आला.संबंधित मुलगी ओळखीच्या मुलांना आपल्या जाळ्यात अडकवत होती.

        त्यानंतर चिमूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांचे नाव घेऊन, “पोलीस कारवाई होईल अशी भीती दाखवत पैसे मागवले जात होते.प्रत्यक्षात उपनिरीक्षक मरकाम यांना या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती.

        फसवणूक झालेल्या मुलांकडून एकूण १ लाख ३३ हजार रुपये शहरातील वेगवेगळ्या दुकानातील स्कॅनरवरून ऑनलाईन घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. 

       या प्रकारानंतर पोलिसांनी मुलीची आई व शिक्षिका यांना बोलावून समुपदेशन केले.यावेळी मुलीने स्वतःच्या कबुलीजबाबात गुन्हा मान्य केला असून,त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. 

कोट….

     तक्रारदार मुलाने थेट पोलीस ठाण्यात येऊन हा प्रकार सांगितल्याने सत्य उघडकीस आले.अशा पद्धतीने कुणी पोलीस अधिकाऱ्यांचा धाक दाखवत ब्लॅकमेल करत असेल तर नक्की तक्रार द्यावी,” असे आवाहन उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांनी केले.