ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : येथील नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई) जमनापूर/साकोली मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्राचार्या भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे व पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
शाळा व्यवस्थापक, प्राचार्या व प्रशासकीय अधिकारी यांनी थोर नेत्यांच्या जीवनकार्याची प्रेरणादायी माहिती दिली. “क्षमा हे बलवानाचे लक्षण आहे, दुर्बल कधीच क्षमा करू शकत नाही” या गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करावा, तसेच शास्त्रीजींच्या देशहितकारी मार्गाचे अनुकरण करून राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थ्यांसाठी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंत खोब्रागडे, अजय बाळबुद्धे, किशोर बावनकुळे, विन्नुष नेवारे, श्रीधर खराबे, विजय परशुरामकर, जोशिराम बिसेन, प्रशांत वालदे, सरताज साखरे, रोझी पठान, सुनिता बडोले, वैशाली भगतकर, दिपा येले, प्रतिमा डोंगरे, स्वेजल टेंभुर्णे, माधुरी हलमारे, ज्योती डोंगरवार, लिलेश्वरी पारधी, वैशाली राऊत, रेखा हातझाडे, अस्मिता मस्के, अनिता धुर्वे, मेघा संग्रामे, जया बडवाईक तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्यप्रभा उपासे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रिती फुलबांधे यांनी केले.



