Home Maharashtra दिनदहाडे चालणाऱ्या जुगार अड्ड्याला आशिर्वाद कुणाचा?…

दिनदहाडे चालणाऱ्या जुगार अड्ड्याला आशिर्वाद कुणाचा?…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक..

          चिमूर तालुका जुगारमय करण्याचा ईडा कुणी उचलला हे पोलिस विभागासह नागरिकांना माहिती नाही.यामुळे बेकायदेशीर क्लबच्या नावावर चिमूर,भिसी,येथे बिनधास्त चालणारे लाखो रुपयांचे जुगार अड्डे म्हणजे इतिहासीक वारसा लाभलेल्या दोन्ही शहराला बदनाम करणारा प्रकार असल्याचे जनमत आहे.

          चिमूर विधानसभा मतदारसंघ दारुमय करुन झाले,आता जुगारमय करणे सुरू झाले आहे.आणि भविष्यात या मतदार संघात वेश्याव्यवसायाचे जाळे पसरविण्याचे काम सुरु झाले तर कुणालाही नवल वाटण्याचे कारण नकोय..

         चिमूर आणि भिसीला बेकायदेशीर क्लबच्या नावावर चालणारे जुगार अड्डे हे करोडो रुपयांच्या उलाढाली अंतर्गत सुरु असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे.या जुगार अड्ड्यावर स्थानिक जुगाऱ्यांसह अनेक शहरांतील व गावातील जुगारी आपली उपस्थिती दर्शवीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

            अशा बेकायदेशीर जुगार अड्ड्यांना राजकीय वरदहस्त राहात असल्यामुळे पोलिस विभाग सुध्दा मुंग गिळून मुकदर्शक भुमिका घेतो काय?असा दोन्ही शहरांतील नागरिकांचा अंतर्मुख करणारा मुद्दा आहे.

         चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा भिसी हे सांस्कृतिक नगर असल्याची परंपरा आहे.या परंपरेला गालबोट लावण्याचे काम काही जुगारी करीत असल्याचे दिसून येते आहे.

          तर चिमूर शहर हे स्वातंत्र्याच्या इतिहासात अजरामर झाले आहे.अशा या शहराला जुगार अड्ड्यातंर्गत जुगारमय करण्यासाठी हालचाली करणे कितपत योग्य आहे हेच कळायला मार्ग नाही.

           चिमूर आणि भिसी शहरात दररोज चालणारा जुगार हा लाखों रुपयांच्या घरात असल्याची लोक चर्चा आहे.सदर जुगार अड्ड्यावर दररोज बसणारे जुगारी हे लाखो रुपये कुठुन आणतात?,हा गंभीर प्रश्न आहे.. तद्वतच तो एक चौकशीचा भाग आहे.

          उघड्यावर किंवा एकांत जागेत जुगारी जुगार खेळत असतील तर त्याचा विपरीत परिणाम समाजमनावर आणि न खेळणाऱ्या नागरिकांवर पडत असतोय.

          रम्मी,कट पत्ता,तिन पानी हे जुगारातील खेळ लाखो रुपयांच्या उलाढाली अंतर्गत येत असून या खेळाला अनुसरून कोण केव्हा बरबाद होईल हे सांगता येत नाही.

        या खेळाचे गंभीर परिणाम संबंधितांच्या कुटुंब सदस्यांवर पाडणारे असून पुर्ण कुटुंबाला कंगाल करणारे आहे व समस्याग्रस्त बनविणारे आहे.

         या जुगार अड्ड्याचे सुत्रधार कोणीही असोत,पण ते रट्टे गट्टे पाहिलेले व्यक्ती दिसून येत आहेत.याचबरोबर अशा लोकांचे संबंध राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत व लोकांसोबत राहात असल्याने यांना अटक न होण्याची जास्त शक्यता असते.

         चिमूर ठाणेदार व भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोंगाडे,पिएसआय भरत थिटे यांनी वेळीच सदर जुगार अड्ड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

          नव्हे तर संबंधितांनी जुगार अड्ड्याचे ठिकाण बदलवले तरी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना कायद्याचा हिसका दाखवला पाहिजे असे लोकमन आहे.याचबरोबर सामुहिक जुगार खेळणे हा संघटीत गुन्हेगारीचा प्रकार असल्याचे लक्षात येते आहे.

       याचबरोबर पोलिस विभाग बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी मागेपुढे पाहत असतील तर नागरिकांनी वेळप्रसंगी स्वतःच्या व गावातील नागरिकांच्या हितासाठी असे अवैध जुगार अड्डे उधळून लावले पाहिजे या मताचा कायदा आहे.