ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा आणि जिल्हा क्रीडा परिषद भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये फ्युचर पोदार लर्न शाळेची यशाची परंपरा कायम राखत विजयश्री खेचून आणली.आज दि. १/१०/२०२५ रोजी झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत १४ वर्षा खालील मुलीच्या ३४ किलो वजन गटात कुमारी लावण्या शेंडे हिने अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तिची निवड नागपुर विभागीय स्तरावर शालेय कराटे स्पर्धेसाठी झाली आहे.ज्युडो या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थिनीने शाळेचे प्रतिनिधित्व केले होते.
याप्रसंगी शाळेचे संचालक संचालिका सौ.नमिता तुमसरे, प्राचार्य निकेशन देऊरमल्ले, समन्वयक राजीव समरीत यांनी लावण्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवरांनी क्रीडा शिक्षक नितीन पोटफोडे यांचेसुध्दा अभिनंदन केले.



