Home उपक्रम महाविस्तार AI अँप बाबत जनजागृती सभा…

महाविस्तार AI अँप बाबत जनजागृती सभा…

ऋषी सहारे 

   संपादक

कुरखेडा : शेतकऱ्यांना हवामान बदल बाजारपेठेतील,अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हांनांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार AI हे अँप लाँच केले आहे. याच महत्वाकांक्षी अँप बाबत शेतकऱ्यानंमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी मौजा वाढोना येथे जनजागृती सभा आयोजित करण्यात आली होती.

        कृषी विभागाने विकसित केलेले हे एक अत्याधुनिक अँप आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने हे अँप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अँप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पदधतींचे मार्गदर्शन करते.

        महाविस्तार AI अँपमधील AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल टाइम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल-टाइममध्ये दाखवते.

          कृषि विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. अँपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी, आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. अँपमधील AI तंत्रज्ञान मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करुन उपाय प्राप्त करू शकतात.

         गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार AI अँप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा,असे आवाहन तालुका कृषि अधिकारी,कुरखेडा रूपाली जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.