भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन दिनांक – 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 02 ऑक्टोंबर 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये “सेवा पंधरवाडा” कार्यक्रम तिन टप्यांमध्ये राज्यभर राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने तिसरा टप्पात जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थीतीचा विचार करुन नावीन्यपुर्ण उपक्रम…
28 सप्टेंबर, 2025 ते 02 ऑक्टोबर, 2025 उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कालावधीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत जे एस पी एम महाविद्यालयात विध्यार्थ्यांना शालेय विदयार्थ्यांना विविध दाखले वाटप करणे या मध्ये त्यांना स्कॉलरशिप चा फॉर्म भरण्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असते ही गोष्ट लक्षात घेऊन महसूल विभाग धानोरा यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला महाविद्यालयामध्ये देण्यात आला.
यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचला त्यामुळे विद्यार्थी आनंदित झाले त्यामुळे महाविद्यालयाने महसूल विभागाचे आभार मानलेत असेच उपक्रम पुढेही राबविण्यात येतील असे आश्वासन महसूल विभागामार्फत देण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय थुल सर, डॉ.पंकज चव्हाण सर, प्राध्यापक धाकडे सर, मंडळ अधिकारी वालिवकर मॅडम, तलाठी कुळमेथे मॅडम मेश्राम किरंगे प्रा.खोब्रागडे, प्रा.आवारी, प्रा.करमनकर,प्रा.रणदिवे, भास्कर कायते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



