Home Social पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्या :- मुख्याधिकारी प्रितिश मगरे…

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्या :- मुख्याधिकारी प्रितिश मगरे…

भाविकदास करमनकर

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

शहरातील पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभघ्यावा, असे आवाहन धानोरा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी प्रितिश मगरे यांनी केले आहे. कोरोना काळामध्ये देशातील पथविक्रेते आर्थिक अडचणीत सापडले होते.

          याची दखल घेऊन पथविक्रेत्यांना भांडवल मिळावे. यासाठी केंद्र शासनानी पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSWANIDHI) योजना सुरू केली होती. याचा लाभ देशातील कोट्यवधी पथविक्रेत्यांना झाला. या योजनेचा कालावधी यापूर्वी 31 डिसेंबर 2024 पर्यंतच होता.

           त्यामुळे अनेक पथविक्रेत्यांना आर्थिक अडचणीत सापडले होते. याची दखल घेऊन केंद्र सरकारने सदर योजनेचा कालावधी वाढवून ही योजना 31 मार्च 2030 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे धानोरा शहरातील फेरीवाले, लघु उद्योजक व त्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे पर्यावक्रेत्यांतून आनंद व्यक्त होत आहे.

          या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्ज मर्यादा पूर्वी 10 हजार रुपये इतकी होती, ती आता 15 हजार रुपये करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्यातील कर्ज मर्यादा 20 हजारांवरून 25 हजार रुपये करण्यात आली असून, तिसऱ्या टप्यातील कर्ज मर्यादा 50 हजार रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.

        याशिवाय, योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या फेरीवाल्यांना यूपीआय-लिक रूपे क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. त्याद्वारे पथविक्रेत्यांना अचानक उद्भवणाऱ्या व्यवसायिक गरजांसाठी तत्काळ आर्थिक मदत मिळू शकेल.

          तसेच डिजिटल व्यवहारांवर रुपये । हजार 600 पर्यंत कॅशबॅक मिळण्याची सुविधाही आहे. या माध्यमातून फेरीवाले व लघुउद्योजकांना डिजिटल पद्धतीने व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.

          या योजनेचा लाभ घेण्याकरिता तथा अधिक माहितीकरिता नगर पंचायतीच्या शहर अभियान व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन धानोरा नगर पंचायतच्या वतीने मुख्याधिकारी प्रितिश मगरे यांनी केले आहे.