Home देशविदेश स्वातंत्र्य : सजीवांचे आणि निर्जीवांचे…

स्वातंत्र्य : सजीवांचे आणि निर्जीवांचे…

         स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य अशा दोन संकल्पनांचा शोध मानवाने लावला.स्वातंत्र्य याचा अर्थ स्वतःचे तंत्र आणि मंत्र.मंत्र म्हणजे तत्व,सिद्धांत,विचार,वैचारिक भूमिका.आणि तंत्र म्हणजे पद्धत ( टेक्निक,सिस्टिम ).स्वतःचे विचाराने आणि पद्धतीने बोलण्याचा वागण्याचा म्हणजे व्यवहार ,आचरण करण्याचा हक्क अधिकार म्हणजे स्वातंत्र्य होय.अर्थात सजीवांना ( मानव पशु पक्षी कीटक वनस्पती ) हे एकेंद्रिय , द्विइंद्रिय, त्रि इंद्रिय,चार इंद्रिय, पंच इंद्रिय सजीव म्हणजे देहधारीजीव ) बुद्धी आणि मन असते.आणि निर्जीवाना ( वस्तू,पदार्थ ) यांना बुद्धी आणि मन नसते.जीवसृष्टी म्हणजे जिवंतसृष्ठी,आणि जड सृष्टी म्हणजे निर्जीवसृष्टी.

        माती,पाणी,अग्नी,हवा,अवकाश ( आकाश ) ही पंच महाभूते.आणि यांच्यापासून किंवा यांचे संयोगाने निर्माण झालेल्या वस्तू आणि पदार्थ म्हणजे निर्जीव .उदा.शेतीतून निर्माण होणाऱ्या वस्तू, माल.आणि कारखान्यातून निर्माण होणाऱ्या वस्तू , माल.किंवा उद्योग आणि सेवा उद्योग यातून निर्माण होणाऱ्या वस्तू, माल म्हणजे निर्जीव.यांना जीव नसतो. ज्यांना जीव असतो,त्यांनाच बुद्धी मन असते,म्हणून त्यांच्यात विचार आणि भावना निर्माण होतात.विचारातून तत्व,सिद्धांत,संकल्पना निर्मित होतात आणि मनामुळे म्हणजे भावना मुळे त्या विचार तत्व सिद्धांतावर विश्वास,श्रद्धा,भावना बसते.यातून संस्कार माणसाचे संस्कारविश्व तयार होते.आणि जसे संस्कार तसे माणसाचे आचरण ,व्यवहार होतो.यातूनच रूढी,परंपरा,निर्माण होतात.यातूनच ‘ जात ‘ ही रूढी आणि धर्म,पंथ या परंपरा निर्माण झाल्या.

    सजीवांचे परिणाम आणि परिणामाची कारणे याचे चिंतन झाले.या लेखाची पार्श्वभूमी विषद करणे आवश्यक होते,म्हणून हे करावे लागले.आता मूळ विषयाकडे येऊ.स्वातंत्र्य : सजीवांचे आणि निर्जीवांचे.निर्जीव म्हणजे वस्तू आणि पदार्थ यांना बुद्धी आणि मन नसते.कारण त्यांच्यात जीव नसल्यामुळे.यांचे स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य हे पंचेंद्रिय मानवावर अवलंबून आहे.याच प्रमाणे पाच सोडून बाकी इंद्रिय असलेले जीवांचे स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य हे मानवाच्याच हाती आहे.पशु पक्षी वृक्ष कीटक या जीवाचे स्वातंत्र्य पंचंद्रिय मानवा वरच अवलंबून आहे.कारण यांची बुद्धी आणि मनाला मर्यादा आहे.माणसाच्या बुद्धी आणि मनाला मर्यादा नाही.परंतु त्याच्या शरीर बुद्धी मन यांच्या शक्तीला मर्यादा आहे.यात कमीजास्तपणा आहे.म्हणून ज्यांची शारीरिक शक्ती,मनाची बुध्दीची शक्ती जास्त अशी माणसे कमी शक्तींच्या माणसांचे स्वातंत्र्यावर बंधन आणतात. सबल दुर्बलांचा हक्क अधिकार छिनुन घेतात.म्हणून दुर्बल पारतंत्र्यात तर सबल स्वातंत्र्यात नांदत असतात.खरे तर शक्तिहीन माणसे शरीर शक्तीने कमी असले तरी बुद्धीने मनाने दुर्बल नसतात,पण त्यांचेवर असे संस्कार केले जातात की,त्यांची मानसिकताच ” आपण दुर्बल असल्याची ” बनते.जसे गुलामी.परंतु गुलामाला आपण देव दैव,परिस्थिती मुळे गुलाम नाही,तर आपली मानसिकता गुलामीची आहे,ती दूर केल्याशिवाय आपली गुलामी, पारतंत्र्य नष्ट होणार नाही” ,अशी जाणीव जेंव्हा त्यास होईल, तेंव्हा ” ऊठ वेड्या तोड बेड्या ” या वाक्यानुसार गुलाम बेड्या तोडून मुक्त होतील,म्हणजेच स्वातंत्र्यात जगतील.

      पारतंत्र्य म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणे,स्वावलंबी नसणे.स्वातंत्र्य गमावून बसणे,आपल्या अंतरशक्ती चे ( क्षमता,हुशारी,कौशल्य ) ज्ञान नसणे. स्वतःवर स्वतःचा ताबा नसणे,स्वतःवर ( स्वतःच्या बुद्धीवर,मनावर,शरीरावर ) स्वतःचा ताबा नसणे.त्यावर दुसऱ्याचा ताबा असणे.म्हणजे परावलंबी जीवन जगणे,म्हणजे पारतंत्र्य होय.

    मनूने मनु स्मृती ( संविधान ) निर्माण केले,मनूच्या कायद्याने अखंड भारत आणि त्यातील अखंड समाजाचे ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शूद्र असे चार तुकडे केले,चार तुकड्याचे साडे सहा हजार तुकडे ( जाती ) केले.त्यामुळे समाजाची संघीय ताकद दुर्बल झाली.अखंडत्व नष्ट झाले.हे पाप मनूने केले.ते बाबासाहेबांनी जाळले आणि परत अखंड भारत आणि त्यातील जनता अखंड राहण्याची तेही विविधतेत एकता निर्माण करणारे असे ताकदवान संविधान निर्माण केले.म्हणून ज्यांना मानसिक गुलाम बनविले,दुर्बल बनविले त्यांना त्या गुलामीतून,पारतंत्र्यातून बाहेर निघण्यासाठीचे कायदे हक्क अधिकार दिले.म्हणूनच आज आपण आर्थिक दृष्ट्या दुर्बल जरी असलो तरी मानसिकदृष्ट्या सबळ आहोत,म्हणून आपणास स्वातंत्र्याची वाट सापडली.

       सजीव सृष्टीवर आणि निर्जीव सृष्टीवर आजही सबलांचीच सत्ता आहे,जमीन,पाणी,हवा,भूप्रदेश,यावर सबल राष्ट्रांची आणि देशांतर्गत सबल व्यक्तींचीच सत्ता म्हणजे अधिकार आहे.सर्व हक्कांचे धनी,मालक तेच.आपण गरीब,मध्यम ( दुर्बल लोक ) फक्त संविधानामुळे संघर्ष करीत आहोत,अन्यथा हेही करता आले नसते. जगात,आपल्या देशात सत्ता संपती प्रतिष्ठा ,जास्तीतजास्त सबळांकडे आणि अत्यल्प दुर्बलांकडे आहे.ही आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक गुलामी बहुसंख्यांची आहे.सारे राजकीय कार्यकर्ते,बहुतांशी पत्रकार हे राजकीय नेत्यांच्या ताब्यात आहेत,त्यांनी आपले स्वातंत्र्य गमावून बसले आहेत.यांना यांचे स्वतःचे विचार,बुद्धी मन नाही,हे नेत्यांच्या स्वाधीन करून मजा मारताहेत.गुलामीतील ही मजा होय.पण स्वार्थापायी जसे जमीनदार निजामाचे गुलाम होते,तसेच हे आहेत.सामाजिक स्वातंत्र्य जातीत अडकून बसले,काढण्याचा प्रयत्न होतो आहे,पण त्रोटकच.आर्थिक स्वातंत्र्य भांडवलशाहीत,भांडवली व्यवस्थेत अडकून b पडले,आर्थिक स्वातंत्र्याचा लढा देणाऱ्यांना नक्षलवादी म्हणून गोळ्या घातल्या जात आहेत,तरी ते तत्व आणि सिद्धांतशी एकनिष्ठ असल्यामुळे टिकून आहेत.सारे देवभक्त, धर्मभोळे हे महाराज, मठाधीश,गुरु यांचेकडे आपला मेंदूआणी मन गहाण ठेवले आहेत,म्हणून मानसिक गुलाम बनलेत.म्हणूनच देवाचे अधिकारी आणि धर्माचे ठेकेदार ऐश करतात,एखाद्या नेत्यासमान,भांडवलदार जमीनदार सारखे. गाडी घोडी विमान , five star hotel सारखे राहणे,श्रीमंतांचे राहणीमान पाळणे हे आता भागवेधारी पण करता आहेत.खरे तर अंगावर भगवे घेणे म्हणजे सांसारिक, ऐशारामी जीवनाचा त्याग करणे होय,पण यांनी तर लाजच ( नैतिकता ) सोडली.आणि बिचाऱ्या भक्ताना गुलाम बनवुन त्यांची लुबाडणूक करताहेत.थोडक्यात हे की,धार्मिक क्षेत्रात पण स्वातंत्र्य नाही.

       सजीवांचे आणि निर्जीवांचे स्वातंत्र्य नसून पारतंत्र्य च होय.जोपर्यंत मानसिक गुलामी नष्ट होत नाही,तो पर्यंत बहुजन स्वतंत्र होणार नाहीत.जोपर्यंत बहुजन ( गरीब मध्यम वर्गीय ) स्वतंत्र होणार नाहीत,तो पर्यंत जमीन,पाणी,हवा,भूभाग,कारखाने,उत्पादित वस्तू,आणि पदार्थ हे पण मुक्त होणार नाहीत.एव्हढे जरी समजले तरी आत्तापुरते बास्स झाले.पुढचे पुढे बघू.काय आणि कसे करायचे ते.

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : १ ऑक्टोबर 2025. फोन : 9420912209.