Home देशविदेश RSS, मोहन भागवत, मोदी, शहा आणि गवई परिवार एकाच माळेचे मणी….

RSS, मोहन भागवत, मोदी, शहा आणि गवई परिवार एकाच माळेचे मणी….

 तथागत भगवान बुद्धांनी या विश्वाच्या पहिल्या निसर्ग तत्वज्ञानावर पहिल्यांदा वर्मी घाव घालणाऱ्या…….

 मनुवाद्यांना ( RSS……) 

     सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी पहिल्या प्रतीक्रांतीला शह देऊन विश्वात प्रथम……

     धम्मक्रांती ( नैसर्गिक तत्वज्ञानाला उजाळा ) घडवून आणली…. 

जी स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मुल्यावर आधारित होती.

     म्हणून क्रांती आणि प्रतीक्रांती यांच्यात तेंव्हापासून नेहमी संघर्षाची लाट येत राहिली आहे. यांच्यात कधीच सरमिसळ होऊच शकत नाही. म्हणजे थोडीशी क्रांती किंवा थोडीशी प्रतीक्रांती अशी सरमिसळ होऊ शकत नाही.

       उलट प्रतीक्रांतीचे पुरस्कर्ते तशी सरमिसळ करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांच्याकडे सत्याची आणि विवेकाची प्रचंड उणीव असते, असं म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे ती नसतेच……!

        मग ते तत्वज्ञानाच्या माध्यमातून ते एकटे पडल्यामुळे मग ती अशी सरमिसळ करण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच मग साम, दाम, दंड आणि भेदाच्या कुटनीतीचा जन्म होऊन सर्वधर्मसमभाव किंवा समरसता अशा वरण – भाताच्या, तुंपातून गोड शब्दांचा जन्म झाला…..!

   जो बहुजनांना आकर्षित करणारा ठरला…..!

    शेवटी गुळात विष टाकले काय आणि विषात गूळ टाकले काय परिणाम तोच माणूस मरणारच. हे निश्चित.

         अशीच भेसळ निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात संविधान निर्मितीच्या नंतर या मनुवाद्यांकडून सुरुवात झाली. यामध्ये कट्टर मनुवादी RSS तर होतीच कारण ती तर निर्मातीच आहे. परंतू काही स्वतःला बुद्धवादी, आंबेडकरवादी म्हणवणारे सुद्धा त्या काळात निर्माण झाले. त्यामध्ये हा गवई परिवार त्यापैकी एक आहे…..!

          आता जातीत जन्माला म्हणून काही आंबेडकरवादी होईल किंवा बुद्ध धम्मवादी होईल. असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण हे समीकरण आता 2014 पासून दिसायला सुरुवात झाली आहे. तशी त्याची सुरुवात 1956 नंतर लगेच सुरुवात झाली होती. परंतू आम्हाला ती दिसून यायला एवढी वर्षे लागली.

    जेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 ला ” भारताचे संविधान ” संविधान सभेला प्रदान केले. त्यानंतरच्या चौथ्याच दिवशी याच RSS ने हे संविधान आम्हाला मान्य नाही. याच्यात मनुसंहिता अजिबात नाही म्हणून धिक्कार केला होता. एवढेच नव्हे तर याच RSS वाल्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( संविधान निर्मात्याची अर्थात आमच्या बापाची ) यांची जिवंत प्रेतयात्रा काढली होती…..!

    अशी मनुस्मृतीवादी, मनुवादी विषारी पिलावळ असताना……

        अमरावतीचा गवई परिवार याच RSS च्या वर्धापनदिनाच्या महोत्सवाला 1981 ला रामकृष्ण गवई (ज्यांच्या ज्यांच्या नावात राम असतो ते गद्दारच निघतात ) यांनी हजेरी लावली आहे. आणि वर तोंड करून सांगताय की आम्हीच खरे आंबेडकरवादी म्हणून निर्लज्जपणे…….!

         तुम्हाला कोणती विचारसरणी स्वीकारायची ते तुम्ही स्वीकारा. ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे. परंतू , समाजाला का तुम्ही वेठीस धरताय……!

    एकतर तुम्ही दिक्षाभूमी RSS च्या दावणीला बांधली……

        ज्या भारताच्या संविधानाला RSS ने विरोध केला. त्याच संविधानाच्या आरक्षणामुळे तुमचे सुपुत्र सरन्यायाधीशापर्यंत पोहोचले. आणि तुम्ही एस. सी. प्रवर्गात उपवर्गीकरण्याची शीफारस करता……..!

    चार महिने झाले त्या पदावर आपण विराजमान झालात. शेवटचे दोन महिने शिल्लक राहिले. अजूनही तुम्ही महाबोधी बुद्ध विहार मुक्तीचा मार्ग मोकळा केला नाही. EVM हटवीण्याचा आदेश दिला नाही. राजस्थानच्या उच्च न्यायालयाच्या आवारातील मनुच्या पुतळ्याला हटवीण्याचे आदेश दिले नाही. केवळ सत्कार आणि कनिष्ठ न्यायालयाचे उदघाटन करण्यात आणि उपस्थिती दर्शवण्यातच चार महिने घालवली. आता उरलेल्या दोन महिन्यात तुमच्याकडून काही अपेक्षा आम्ही ( भारताच्या लोकांनी ) ठेवलेल्या नाहीत.

      ते तुम्ही करुही शकणार नाही. कारण तो तुमचा पिंडच नाही. तुमचा पिंड संविधानविरोधी अर्थात RSS वादी आहे……!

        आणि आदरणीय कमलाआईने तरी या RSS च्या 5 आक्टोबरच्या महोत्सवाला जाऊ नये ही अपेक्षा होती. परंतू डॉ. राजेंद्र गवई यांच्या परवाच्या स्टेटमेन्ट मधून तुम्ही RSS वादी आहात. हा शिक्का बसला.

       ज्या दिवशी कमलाआईना हे निमंत्रण आले. त्याच दिवशी त्याचा त्यांनी स्वतः खुलासा करायला हवा होता. परंतू , त्यांनी तळ्यात – मळ्यात या मानसिकतेमुळे त्यांनी मौन धारण केले.

      आता तुम्ही 5 आक्टोबरच्या कार्यक्रमाला जा किंवा जाऊ नका. याने समाजाला कांहीही फरक पडणार नाही……!

    कारण तुम्ही शेवटी RSS, मोहन भागवत, मोदी, शहा एकाच माळेचे मणी आहात……!

        एकीकडे मणिपूर 800 दिवसापासून तिथली जळती राख विझलेली नाही. दक्षिणेत अशांतता पसरत आहे. लडाखमध्ये न्याय मागणाऱ्या जनतेच्या आंदोलकांच्या नेत्याला मोदी, शहाने जेलमध्ये टाकले. ज्याने पर्यावरण सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आंदोलन केले. तरी तुम्ही सरण्यायाधीश म्हणून कसे काय गप्प बसू शकता……?

         याचे उत्तर एकच की अमरावतीचा गवई परिवार RSS वादी आहे. हेच सत्य आहे….!

        RSS ( जिची धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी नसून शस्त्राची पूजा केली जाते. यांना शहरी नक्षलवादी का म्हणू नये..?) ने आपल्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त एस. सी. प्रवर्गात जन्मलेल्याना म्हणजेच माजीराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आणि अमरावती येथे कामालाआई गवई यांना निमंत्रण पाठवून आम्ही सर्वधर्मसमभाव आणि समरसतावादी आहोत. असा जो मेसेज दिला. त्यामागे षडयंत्र हे आहे, की कार्यकारीमंडळ आणि न्यायमंडळ आता वेगळे नाहीत एकच झाले. असा जो मेसेज दिला, तो संसदीय लोकशाहीला आणि संविधानाला मारक ठरणारा आहे…….!

         जसा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी मोदींनी गणपतीच्या आरतीला हजेरी लावली. असाच हा प्रकार आहे……!

   परंतू , एक लक्षात ठेवा संविधानविरोधी शक्तीवाल्यानो आम्ही भारताच्या लोकांनी तुम्हाला पुरतं ओळखलं आहे. तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही….. 

         आता आम्ही कोणत्याही नकली आंबेडकरवाद्यासोबत न जाता आम्ही ( भारताचे लोकं ) केवळ संविधानवादी आहोत आणि शेवटपर्यंत संविधानवादीच राहणार……. 

    जागृतीचा कृतीशील लेखक

            अनंत केरबाजी भवरे 

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689